Vegetable Market Fire : शॉर्टसर्किटने पूर्ण मार्केटच जळालं; क्षणात होत्याच नव्हत, ७ लाखांचं नुकसान

Ichalkaranji Municipality : मार्केट पाहण्यास आलेल्या महानगरपालिका अधिकारी आणि भाजी विक्रेते यांच्यामध्ये अंगावर धावून जाण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला होता.
Vegetable Market Fire
Vegetable Market Fireagrowon
Published on: 
Updated on: 

Ichalkaranji Vegetable Market Fire : कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी महानगरपालिका असलेल्या इचलकरंजी येथील हुतात्मा आण्णा रामगोंडा पाटील शाळेजवळील बंदिस्त भाजी मार्केटला भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या आगीत निम्मे मार्केट भक्ष्यस्थानी गेल्याने पाच भाजी विक्रेत्यांच्या दुकानांची भयानक अवस्था झाली होती. आगीत भाजीपाला, वजनकाटे व अन्य साहित्य असे एकूण सुमारे सात लाखांचे नुकसान झाले.

याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताचे ते पाहणीसाठी आल्यानंतर वादावादी झाल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते. महानगरपालिका अधिकारी आणि भाजी विक्रेते यांच्यामध्ये अंगावर धावून जाण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला होता.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेचे एकमेव बंदिस्त भाजी मार्केट आहे. याठिकाणी नियमित बाजार असतो. गुरुवारी (ता. १०) नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भाजीपाला दुकाने बंद करून विक्रेते घरी गेले.

Vegetable Market Fire
Waterfalls In Kolhapur : कोल्हापुरातील धबधब्यांवर जाण्याची बंदी उठवली, विकेंडला करा प्लॅन

रात्री साडेअकराच्या दरम्यान मार्केटच्या गाळ्यातील बँकेचे सुरक्षारक्षक बंडू बेलेकर यांना धुर आल्याचे दिसले. त्यानंतर बेलेकर व बजरंग कुंभार यांनी याबाबतची माहिती अग्निशमक दलाला दिली. आगीचा मोठा भडका उडाल्याने आगीच्या झळा मार्केटमधील सर्व दुकानांपर्यंत पसरत होत्या. घटनास्थळी मार्केटमधील सर्व भाजीपाला विक्रेते दाखल झाले. अग्निशामक दलाच्या दोन वाहनांसह भाजीविक्रेत्यांनी अवघ्या एका तासात आग आटोक्यात आणली.

आगीत मार्केटमधील भाजी विक्रेते पांडुरंग बुधारपूर यांचे विठ्ठल व्हेजिटेबल्स, अशोक गदगे यांचे विनायक व्हेजिटेबल्स, बजरंग डोईफोडे यांचे विजय भाजी सेंटर, संतोष शिंदे यांचे जय मल्हार तर मारुती बुधारपूर यांचे बालाजी व्हेजिटेबल्स भाजी दुकान जळून खाक झाले. भाजीपाल्यासह इलेक्ट्रिक वजनकाटे, साहित्य, पाट्या अन्य साहित्य असे एकूण सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त केतन गुजर यांनी नुकसानस्थळाची पाहणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, मदन कारंडे, नितीन जांभळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर मुसळे आदींनी भेट केली. शॉर्टसर्किटने लागलेली आग इमारतीच्या भिंतीत पाणी मुरल्याने सर्वत्र पसरल्याचे महापालिकेचे विद्युत अभियंता संदीप जाधव यांनी सांगितलं.

भाजीविक्रेत्यांनी आठवडी बाजाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करून ठेवला होता. मात्र, त्याच रात्री आगीचे संकट भाजीपाल्यावर ओढवले, विक्रेत्यांच्या डोळ्यांदेखत भाजीपाला आगीत होरपळला. यामुळे शुक्रवारच्या आठवडी बाजारातील विक्रेत्यांच्या पोटचा घासच आगीच्या घटनेने हिरावून घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.