Soybean Pest : हिंगोलीत सोयाबीनवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव

Soybean Crop : हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर हुमणी, खोडकिडी या किडीचा तसेच विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा, तर कपाशीवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
Humani Pest
Humani Pest Agrowon

Soybean Humani : परभणी ः हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर हुमणी, खोडकिडी या किडीचा तसेच विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा, तर कपाशीवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना माहिती व सल्ला दिला आहे अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सहायक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व वसुंधरा फाउंडेशन, नाम फाउंडेशन यांच्या तर्फे  वसुंधरा फाउंडेशन व नाम फाउंडेशन यांच्यातर्फे बुधवारी (ता. १) हिंगोली जिल्ह्यातील वाकोडी, माळधामणी व बोल्डावाडी (ता. कळमनुरी), गुरुवारी (ता. १०) भिंगी, आंबाळा, चिंचाळा (ता. हिंगोली), तर शुक्रवारी (ता. ११) भगवती, वरखेडा (ता. सेनगाव) या गावांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला.

Humani Pest
Millipede Pest Management : मिलीपीड किडीचा प्रादुर्भाव कसा कमी कराल?

कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, सहायक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी शेतकऱ्यांच्या शेतावरील पिकांची पाहणी केली. डॉ. पटाईत म्हणाले, की वरखेड (ता. सेनगाव) येथील सोयाबीन पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. पिवळा मोझॅक रोगाचा (केवडा) प्रादुर्भाव अनेक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आढळून येत आहे. खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच या रोगचा प्रादुर्भाव ओळखून त्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com