Team Agrowon
शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेला काडीकचरा गोळा करून नष्ट करावा. वाणी ही कीड रात्री सक्रिय असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून सकाळी त्याखालील वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत.
शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करावीत. विशेषतः बांधावरील गवत, दगड काढून बांध मोकळा ठेवावा. बऱ्याचदा आर्द्रता, घनदाट पिकात जास्त पाणी देणे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवणे यामुळे वाणीचा प्रादुर्भाव वाढतो.
जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसांतच वाणी मरतात.
ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केली आहे, तिथे या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.
पिकामध्ये वेळेवर कोळपणी केल्यास जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतील.
चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते.
वारंवार या किडीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी पेरणीपूर्वी कार्बोसल्फान (६ टक्के दाणेदार) किंवा क्लोरपायरिफॉस (१० टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्का) यापैकी एक कीटकनाशक ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून एक हेक्टर शेतात पसरवावे.