Onion Auction : पावसाने कांदा उत्पादकांचे केले वांदे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीत वाहनांच्या रांगा

Kopargaon Market Committee : अहमदनगरमधील कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाने मोठी दैना उडाली आहे.
Kopargaon Market Committee
Kopargaon Market Committeeagrowon

Kopargaon Market Committee : नाशिक पाठोपाठ अहमदनगरमध्ये कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. दरम्यान अहमदनगरमधील कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाने मोठी दैना उडाली आहे. कोपरगाव बाजार समितीत कालपासून कांदा लिलावासाठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये मागच्या २४ तासांत ६३४ वाहनांमध्ये कांद्याची व भुसार मालाची मोठी आवक झाली.

परंतु अचानक पावसाने हजेरी लावल्याने कांद्याचे लिलाव थांबवण्याची वेळ आली. यामुळे जवळपास १५० ते २०० वाहनांमध्ये कांद्याचे लिलाव झाले नाही. यामुळे शेतकर्‍यांना कांदे झाकून वाहने उभी करून ठेवावी लागली.

कांद्याला १६७८ रुपये कमाल भाव तर ३०० रुपये किमान भाव तर १३२५ रुपये सर्वसाधारण भाव प्रति क्विंटल मिळाला होता. काल बाजार समितीच्या नोंदीप्रमाणे १२ हजार ४८० क्विंटल कांदा आवक झाला आहे.

भुसार मालामध्ये विविध धान्यांची आवक झाली होती. मात्र अचानक झालेल्या पाऊस आणि लिलाव ठप्प होऊन वाहने उभी करून ठेवावी लागेल. आता त्या वाहनांतील कांद्यांचा लिलाव गुरुवार आज होतील, असा अंदाज आहे.

Kopargaon Market Committee
Lasalgaon APMC : शेतकरी, व्यापारी, कामगारांना आवश्यक सुविधा पुरविणार

लासलगाव बाजारसमितीत विक्रमी कांद्याची आवक

कांद्यासाठी प्रसिद्ध लासलगाव बाजार (Lasalgaon Bazar) समितीच्या मुख्य आवारात सोमवारी (ता. ३) २ हजार ३५ वाहनांमधून सर्वाधिक ३७ हजार ५५० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यास बाजारभाव किमान ७००, कमाल २६५१ व सरासरी १४६० रुपये क्विंटल राहिला, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सोमवारी बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवारात सकाळपासूनच कांद्याची आवक वाढली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली.

दिवसभरात येथे ४६० ट्रॅक्टर व १५७५ पिकअप अशा एकूण २ हजार ३५ वाहनांतून ३७ हजार ५५० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com