Lasalgaon APMC : शेतकरी, व्यापारी, कामगारांना आवश्यक सुविधा पुरविणार

Farmers Issue : शेतीमाल विक्रेते शेतकरी, व्यापारी व कामगार वर्ग यांच्यासाठी लासलगाव बाजार आवारांवर आवश्यक त्या सोई व सुविधा उभारणार असल्याचे आश्‍वासन लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले.
Lasalgaon APMC
Lasalgaon APMC Agrowon
Published on
Updated on

Nashik News : शेतीमाल विक्रेते शेतकरी, व्यापारी व कामगार वर्ग यांच्यासाठी लासलगाव बाजार आवारांवर आवश्यक त्या सोई व सुविधा उभारणार असल्याचे आश्‍वासन लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले.

Lasalgaon APMC
Nashik Bribe News : लाचखोर खरे यांची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी

बाजार समितीचा पदभार हाती घेतल्यानंतर सभापती क्षीरसागर यांनी नुकतीच लासलगाव मुख्य बाजार आवारावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवारावर व प.पू.भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवारावर प्रत्यक्ष लिलावास अचानक भेट दिली.

Lasalgaon APMC
Nashik News : शेतीमालाला भाव द्या, नाहीतर गोळ्या झाडून आमचे कष्टमय जीवन संपवा

या वेळी उपस्थित शेतकरी, व्यापारी व कामगार वर्ग यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. तसेच संपूर्ण बाजार आवाराची प्रत्यक्ष पाहणी करून बाजार आवारांवर शेतकरी, व्यापारी व कामगार वर्ग यांच्या मागणीनुसार मॉन्सून शेड, उर्वरित वाहनतळाचे काँक्रिटीकरण, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी सिमेंट बाके, शेतकरी निवास, भोजनालय, स्वच्छता गृह आदी आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीचे अधिकारी वर्ग व वास्तुविशारद यांना सूचना दिल्या.

याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य प्रविण कदम, बाळासाहेब दराडे, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, नंदकुमार डागा, नितीनकुमार जैन, ओमप्रकाश राका, मनोज जैन, चंद्रप्रकाश डागा, मेघाराम परीहार, अजित भंडारी, सुरेश खुर्दे, मोतीराम थोरात, अमर ब्रह्मेचा, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सागर थोरात, दत्तात्रय खाडे, कपील कापडी, श्रीनिवास मुंदडा, भास्कर कोकणे, सचिन शिंदे, संदीप गोमासे, अमोल गिते,

रवींद्र शिंदे, वृषभ राका, किरण आमले, गणेश पवार, बाजार समितीचे वास्तुविशारद नितीन चव्हाण, सहसचिव प्रकाश कुमावत, लेखापाल सुशील वाढवणे, लिलाव प्रमुख सुनील डचके, प्रभारी काकासाहेब जगताप, पंकज होळकर, भास्कर उगलमुगले, मनोज शेजवळ, गोरख विसे, सचिन वाघ, अरुण कुऱ्हाडे यांच्यासह शेतकरी, व्यापारी व कामगार उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com