Agriculture Market : आठवडाभरात शेतीमाल बाजार कसा राहीला?

चालू आठवड्यात शेतीमाल बाजारात संमिश्र चित्र होतं. आंतराष्ट्रीय बाजारात जवळपास सर्वच शेतीमालाच्या बाजारात चढ उतार राहीले. मात्र देशातील बाजारात महत्वाच्या शेतीमालाचा बाजार स्थिर होता.
 Agriculture Market
Agriculture MarketAgrowon


अनिल जाधव
पुणेः चालू आठवड्यात शेतीमाल बाजारात संमिश्र चित्र होतं. आंतराष्ट्रीय बाजारात जवळपास सर्वच शेतीमालाच्या बाजारात चढ उतार राहीले. मात्र देशातील बाजारात महत्वाच्या शेतीमालाचा बाजार स्थिर होता. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि हरभरा या महत्वाच्या शेतीलाचा बाजार कसा राहीला याचा हा आढावा.

 Agriculture Market
Onion Market Rate : कांदा उत्पादकांना कसा बसतोय तिहेरी फटका ?

सुरुवातीला आपण आपल्या सर्वांच्या आतुरतेचा विषय म्हणजेच सोयाबीन बाजाराची माहिती घेऊ. आंतरराष्ट्रीय बाजारात गेले आठवडाभर सोयाबीनच्या दरात चढ उतार राहीले. सोमवारी बाजार उघडला तेव्हा सोयाबीन १४.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. आठवडाभर दर कमी जास्त होत शुक्रवारी १४.८० डाॅलरवर बाजार बंद झाला. म्हणजेच आठवडाभरात सोयाबीन दर २५ सेंटने सुधारलं.

सोयातेलाचे दर सोमवारी ६२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. ते आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी ६३ सेंटवर पोचले. मात्र सोयापेंडच्या दरात चांगली वाढ झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयापेंडचा बाजार ४४७ डाॅलर प्रतिटनावर उघडला. मात्र शुक्रवारी सोयापेंडचा बाजार ४६० डाॅलरवर बंद झाला. म्हणजेच सोयापेंडच्या दरात टनामागं १३ डाॅलरची सुधारणा झाली.

 Agriculture Market
Agriculture : रस्त्यावर पाण्यामुळे शेतीमाल विक्रीसाठी कसरत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात वाढ होऊनही देशात मात्र त्याचा परिणाम जाणवला नाही. देशातील सोयाबीन बाजार स्थिर राहीला. देशात सोमवारी सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला होता. तो शुक्रवारी कायम होता.

……………..
कापूस बाजार
आता कापूस बाजारात या आठवड्यात काय घटलं ते पाहू…आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कापूस ७८ सेंट प्रतिपाऊंडवर होता. कापसाच्या दरातही आठवडाभर चढ उतार  राहीले. मात्र शुक्रवारी कापसाचा बाजार ८२ सेंटवर बंद झाला. म्हणजेच कापसाने या आठवड्यात ४ सेंटने उभारी घेतली.

देशात मात्र कापसाचा बाजारही स्थिर होता. डिसेंबरच्या सुरुवातीला कापसाचा भाव नरमला होता. तो याही आठवड्यात कायम राहीला. देशात सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ४०० ते ९ हजार ४०० रुपये दर मिळतोय. याच दरपातळीवर आठवड्यात बाजार बंद झाला.
………..

मका बाजाराची स्थिती
मका बाजाराचा विचार करता, आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारातही दर नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात मक्याचा बाजार प्रतिटन ६५८ डाॅलरवर उघडला होता.  आणि ६५० डाॅलरवर बंद झाला. म्हणजेच मका टनामागे ८ डाॅलरने नरमला.

देशात सोमवारी मक्याला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार २५० रुपये दर मिळाला. मात्र पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांनी मका निर्यातबंदीची मागणी केली. सरकारनं निर्यातबंदी केली नाही. मात्र त्याचा मानसिक दबाव बाजारावर आला होता. त्यामुळं दर काहीसे नरमले. शुक्रवारी मक्याचा बाजार सरासरी २ हजार १०० रुपयांवर बंद झाला. म्हणजेच मक्याच्या सरासरी दरात क्विंटलमागं १५० रुपयांची घट झाली.
…………..
पुढील आठवड्यातील अंदाज
तसंच तूर आणि हरभरा बाजाराचा विचार करता, देशातील बाजारात दर स्थिर होते. तुरीला सरासरी ७ हजार २०० रुपये दर मिळाला. तर हरभऱ्याचे व्यवहार ४ हजार ६०० रुपयाने पार पडले. पुढील आठवड्यात देशात सोयाबीनच्या दरात जास्त वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. दरात १०० ते २०० रुपयांची तेजी मंदी राहू शकते. तर कापसाच्या बाजारात क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते. मका, तूर आणि हरभरा दर कायम राहू शकतात, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com