Water Conservation : गरम पाण्याचे कुंड, बारवाचे कोंडिवतेमध्ये संवर्धन

महाराष्ट्रात गरम पाण्याची कुंडे व बारव अनेक ठिकाणी आढळतात. यातील बहुतांशी ठिकाणे संवर्धनाअभावी काळाच्या पडद्याआड जात आहेत. जागतिक वारसा सप्ताहनिमित्ताने २
Water Conservation
Water ConservationAgrowon

महाड : महाराष्ट्रात गरम पाण्याची कुंडे (Hot Water Pool) व बारव अनेक ठिकाणी आढळतात. यातील बहुतांशी ठिकाणे संवर्धनाअभावी (Water Conservation काळाच्या पडद्याआड जात आहेत. जागतिक वारसा सप्ताहनिमित्ताने (World Heritage Week) २२ नोव्हेंबरला महाड तालुक्यातील कोंडीवते येथील गरम पाण्याचे कुंड, बारव येथे साद सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे संवर्धन मोहीम घेण्यात आली.

Water Conservation
Water Conservation : श्रमदानातून उभारले ३ हजार वनराई बंधारे

गरम पाण्याचे कुंड असलेली विहिरीलगत उगवलेले गवत आणि झाडेझुडपे साफ करण्यात आली. बारव असणाऱ्या ठिकाणी साचलेला गाळ काढण्यात आला. संरक्षक भिंत, तसेच रेलिंगच्‍या दुरुस्‍तीबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आला.

Water Conservation
Water Conservation : लोकसहभागातून बांधले २८८ वनराई बंधारे

मोहिमेत सौरभ म्हस्के, नवनीत चौधरी, केतन फुलपगारे, आदेश वाडेकर, सिद्धेश जाधव, निखिल साळवी, संतोष जाधव यांनी श्रमदान केले. तसेच अरुण कळंबे, श्रावण शिंदे, सुधीर शिंदे, किरण दिघे, किसन शेलार, रोशन जमदाडे या ग्रामस्थांनी आणि मंदिर समितीने मोहीम यशस्वी करण्यात सहकार्य केले.

कोंडीवतेकडे जाण्यासाठी फक्त पायवाट आहे, वाहने जाऊ शकतील, असा रस्ता अस्तित्वात नाही. त्यामुळे राजेवाडी ते गावदेवी मंदिर असा अर्धा किमी रस्त्‍ाा करण्याची मागणी ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे.

असे आहे कुंड आणि बारव

तालुक्यातील सव येथील गरम पाण्याचे झरे असलेले कुंड प्रसिद्ध आहेच, याचबरोबर महाडपासून ५ किमी अंतरावर कोंडीवते गावात ग्रामदैवताच्या आवारात दक्षिणेला चिरेबंदी बांधकामातील अपरिचित कुंडे आहेत. हे कुंड म्हणजे एक छोटी चिरेबंदी विहीरच आहे. मंदिराच्या समोर चौकोनाकृती गरम पाण्याच्या कुंडाची लांबी ५ फूट, रुंदी ४ फूट आणि खोली २० फूट खोली आहे. गरम पाण्याचे झरे सतत प्रवाहित आणि मोकळे राहावेत म्हणून तळाला शिसव लाकडाच्या फळ्या लावल्या आहेत.

बारवात साचला गाळ

गावदेवी मंदिरासमोर डाव्या बाजूला असणारे चिरेबंदी बांधकाम ही एक चौकोनी लहान बारव आहे. बारवेची लांबी ५ फूट आणि रुंदी ४ फूट, तर खोली ८ फूट आहे. सध्या गाळ भरला आहे. मुख्य विहीर ते बारव हे अंतर १२ फूट आहे. ही दोन्ही कुंड धातूच्या पाइपने आतून जोडलेली आहेत. गरम पाण्यात आंघोळीसाठी ५ फूट खोलीपर्यंत पाणी वापरायला उपलब्ध व्हावे, यासाठी ही योजना केल्याचे दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com