

बुलडाणा : जिल्ह्यातून जाणाऱ्या ८७ किलोमीटर गेलेल्या समृद्धी महामार्गाबद्दल (Samrudhhi Mahamarg) भूधारकांमध्ये तेव्हा असलेले गैरसमज दूर करण्याचे लोकाभिमुख काम करणारे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते (Dinesh Gite) यांचा नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ८७ किलोमीटर असून मेहकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तालुक्यातील ५० गावांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गाच्या आखणीतील जमीन मुख्यतः: कोरडवाहू आणि मध्यम धारणाक्षेत्र असलेल्या भूधारकांची होती.
राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच प्रकल्पाबाबत असलेल्या गैरसमजामुळे जनमत प्रकल्पाबाबत नकारात्मक बनले होते. श्री. गिते यांनी संवादकांचे प्रशिक्षण आयोजित करून या प्रकल्पात भूसंपादन प्रक्रियेऐवजी जमिनीच्या थेट खरेदीचे फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले होते. साब्रा -काब्रा (ता. मेहकर) आणि सावरगाव माळ (ता. सिंदखेडराजा) येथे प्रस्तावित नवनगरांमुळे होणारे फायदे सहज सोप्या भाषेत पटवून दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.