Ajit Pawar : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

मुंबई : सततच्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतकऱ्यांची खरीप व रब्बी (Khareep, Rabi Crop) ही दोन्ही पिके वाया (Crop Damage) गेली असून, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत केली.

Ajit Pawar
ZP School: खेड्यांतल्या पोरांच्या शिक्षणाचं काय होणार?

पवार म्हणाले, ‘‘राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. दुसरीकडे पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची गरज आहे. सरकारकडे विरोधी पक्षाच्या वतीने मागणी करणार आहे, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मागितली आहे. त्यांच्याकडे हा विषय मांडणार आहे.

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करू, असे सरकारने सांगितले होते. मात्र अद्याप पैसे जमा केलेले नाहीत. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या प्रश्‍नात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे.

राज्यभरात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. काही लोकांच्या घरात पाणी भरले आहे त्यांना तत्काळ धान्याची मदत द्यावी. राज्य सरकारमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले तरच लोकांना दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.

१०० रुपयांच्या शिध्यात गौडबंगाल

राज्यातील जनतेची शंभर रुपयांत दिवाळी गोड करणार, असे सरकारमार्फत जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी एका कंपनीला काही कोटींचे कंत्राट दिले आहे. मात्र अद्याप जनतेपर्यंत शिधा पोहोचलेला नाही. पारदर्शकपणे व माफक दरात लोकांना हा शिधा मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र यात काहीतरी गौडबंगाल आहे, असेही बोलले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com