Heavy Rain । उमरगा तालुक्यातील पाचपैकी ४ मंडळांत अतिवृष्टी

उमरगा शहरात शुक्रवारी (ता. २२) सांयकाळी व रात्री दमदार पाऊस झाल्याने पिकांबरोबरच पाणीसाठ्यासाठी उपयुक्त ठरला आहे. उमरगा तालुक्यात यंदा पावसाची स्थिती अंदाजानुसारच सुरू झाली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

उमरगा/लोहारा : उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३६ मंडळात शनिवारी(ता २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची (Rain Update) हजेरी लागली. उमरगा तालुक्यातील पाचपैकी चार मंडळात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. तर लोहारा तालुक्यातील तीनपैकी दोन मंडळांत दमदार पाऊस झाला.

Heavy Rain
Rain : धरण क्षेत्रांत पावसाची काहीशी विश्रांती

उमरगा शहरात शुक्रवारी (ता. २२) सांयकाळी व रात्री दमदार पाऊस झाल्याने पिकांबरोबरच पाणीसाठ्यासाठी उपयुक्त ठरला आहे. उमरगा तालुक्यात यंदा पावसाची स्थिती अंदाजानुसारच सुरू झाली. जून महिन्यात वेळेवर व मुबलक पाऊस नसल्याने पेरण्याला उशीर झाला. बहुतांश शेतकऱ्यांनी पुढच्या पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या. यामुळे उगवलेल्या पिकांना कमी-अधिक पावसाचा आधार मिळत होता. शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी सहाला हलका पाऊस झाला. त्यानंतर साडेआठपासून रात्री दहापर्यंत जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर दहानंतर कमी झाला मात्र रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. शनिवारी (ता. २३) दिवसभरही ढगाळ वातावरण होते, अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू होता. लोहारा तालुक्यातील जेवळी परिसरात शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी साडेचार ते सहा या काळात जोरदार पाऊस झाला. हा पाऊस रात्री दहा वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात होता.

Heavy Rain
Rain Update : धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

या पावसाने या परिसरात पहिल्यांदाच नदीनाल्यांना पाणी वाहिले. सर्वत्र दमदार पाऊस होत असताना या भागात मात्र भिजत पाऊस झाला. मोठ्या पावसाची प्रतीक्षा असतानाच आता परिसरात शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी साडेचार ते सहा या काळात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील जेवढी मंडळांत ५९.५ मिलिमीटर, तर माकणी मंडळात ३९.३ मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस रात्री दहा वाजेपर्यंत होता. हा पाऊस परिसरातील जेवळीसह दस्तापूर, भोसला, सुपतगाव, फनेपूर, वडगाव, माळेगाव, हराळी, करवंजी, हिप्परगा, विलासपूर पाढंरी, धानुरी आदी गावांत कमी अधिक प्रमाणात पडला. या पावसाने या परिसरात यंदा पहिल्यांदाच नदी नाल्यांना पाणी वाहिले असून शेतात सकल भागात पाणी साठले आहे. या भागातील प्रमुख नदी बेन्नितुरा पहिल्यांदा दुधडी भरून वाहिले आहे.

चार महसूल मंडळात अतिवृष्टी

यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्यांदाच शुक्रवारी (ता. २२) रात्री झालेला पाऊस मोठा होता. नदी-नाल्यात मात्र मुबलक पाणी वाहत होते. बऱ्याच शेत शिवारात पाणी साचल्याचे चित्र होते. तालुलक्यातील उमरगा महसुल मंडळात ७७.५ मिलिमीटर, डाळिंब मंडळात ७४.८ मिलिमीटर, मुळज मंडळात ७७.५ मिलिमीटर तर नारंगवाडी महसुल मंडळात ६९.३ मिलिमीटर पाऊस झाल्याने येथे अतिवृष्टी नोंदली गेली आहे. तर मुरूम महसूल मंडळात ६०.३ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com