Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात दुसरा दिवसही जोरदार पावसाचा; नौका किनाऱ्याला

Ratnagiri Rain News : मुसळधार पावसाचा जोर शनिवारी (ता. ९) सलग दुसऱ्या दिवशी कायम आहे.
Ratnagiri Rain
Ratnagiri RainAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri Weather Update : मुसळधार पावसाचा जोर शनिवारी (ता. ९) सलग दुसऱ्या दिवशी कायम आहे. पावसाबरोबर वेगवान वारे वाहत असल्यामुळे मच्छीमारीला ब्रेक लागला आहे. सलग दोन दिवस हर्णे बंदरातील दोनशे मच्छीमारी नौका जयगड, रत्नागिरीसह देवगड किनाऱ्यावर आसरा घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

पावसाचा जोर शुक्रवारपासून (ता.८) सुरूच आहे. जिल्ह्यात सरासरी १२८ मिमी पाऊस झाला. त्यामध्ये मंडणगड ८०, दापोली २४५, खेड ५६, गुहागर १७०, चिपळूण १६१, संगमेश्वर ९३, रत्नागिरी १८०, लांजा १०४, राजापूर येथे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळीवर वाहायला सुरुवात केली.

Ratnagiri Rain
Nashik Rain Update : अखेर महिन्यानंतर तहानलेल्या भुईवर आभाळमाया

शनिवारी (ता.९) दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. या पावसामुळे भात शेतीला संजीवनी मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कातळावरील सुमारे १२००० हेक्टर क्षेत्र राहिले आहे. हा पाऊस पुढे चार दिवस तरी पडत राहावा अन्यथा कातळावरील शेतीला धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचे परिणाम अरबी समुद्रातही जाणवत आहेत. खोल समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्र खवळल्याने मासेमारी करणे अशक्य आहे. किनारी भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने एकावर एक मोठ्या लाटा आदळत आहेत.

Ratnagiri Rain
Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला

बिघडलेल्या वातावरणाचा तडाखा मासेमारीला बसला आहे. पर्ससिननेट मासेमारी सुरू होऊन आठच दिवस झाले असतानाच सुरुवातीलाच ब्रेक घ्यावा लागला आहे. ट्रॉलिंगसह गिलनेटच्या नौकांही बंदरातच उभ्या आहेत. पाण्याचा प्रचंड करंट असल्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकणे अशक्य आहे.

लाटांमुळे नौका पाण्याच्या लाटांवर हलत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मच्छीमारांनी सुरक्षित बंदरावर नांगर टाकला आहे. हर्णे येथील २०० नौकांपैकी शंभर नौकांनी जयगड बंदरावर, रत्नागिरीत ५० तर देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथे ५० नौका उभ्या आहेत. पाऊस आणि वारे थांबत नाहीत, तोपर्यंत नौका बंदरातच उभ्या राहतील असे मच्छीमारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com