Heavy Rain : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाण

गोदावरीला महापुराची स्थिती; पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळित
Heavy Rain in Nashik | Nashik Rain News
Heavy Rain in Nashik | Nashik Rain NewsAgrowon
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने (Heavy Rain Nashik) हाहाकार केला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे पाहायला मिळाले. नदीकाठची पिके पाण्याखाली (Crop Under Water) गेली आहेत. आगामी चार दिवसांत जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी (Heavy Rain Forecast) होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangadharan. D.) यांनी केले आहे. (Nashik Rain News)

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून काही भागात अतिवृष्टीही झाली आहे. दारणा, गंगापूर, गिरणा, पालखेड धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात धोधो पाऊस सुरू असल्याने या समूहाच्या धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आला आहे. गोदावरी, दारणा, कडवा, गिरणा, पुनद, कादवा, पाराशारी या नद्यांना पूर आला आहे.गोदावरी व गिराणा नदीला पूर आल्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याने प्रवाह बदलल्याने पाणी लगतच्या शिवारात शिरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Heavy Rain in Nashik | Nashik Rain News
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

गंगापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, दारणा, भावली, मुकणे, कडवा, चणकापूर, हरणबारी या धरणात मोठया प्रमाणावर आवक होत आहे. इगतपुरी, पेठमध्ये भात रोपे पाण्याखाली गेली. ते कळवण, देवळा तालुक्यांतील गिरणा व निफाड तालुक्यांतील गोदावरी काठच्या गावातील पिके पाण्याखाली गेली आहे. सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तर पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असल्याने पुराचे पाणी शिवारात आल्याने ऊस, मका, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Heavy Rain in Nashik | Nashik Rain News
State Transport: नाशिक जिल्ह्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी धावणार ‘लाल परी’

जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील नानाशी महसूल मंडळात ३९५ मिलिमीटर तर पेठ तालुक्यातील जोगमोडी महसूल मंडळांत ३७६ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पेठ तालुक्यांत सर्वदूर अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. येथे सरासरी ७६९.३ मिमी पाऊस नोंदविला गेला. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील व सर्व तालुक्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना मंगळवारी (ता. १२) सुटी जाहीर करण्यात आली आहे.

या धरणातून विसर्ग सुरू:

धरण...विसर्ग(क्युसेक)

दारणा...१५०८८

कडवा...३५१७

गंगापूर...१००३५

पालखेड...३०१८८

करंजवण...१५६८०

पुणेगाव...३९१८

चणकापूर...२१२७२

हरणबारी...६२२१

नांदूर मधमेश्वर...७८२७६

- देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे पुराचा धोका वाढला

- पेठ तालुक्यात एक जण नाल्याच्या पुराच्या पाण्यात बुडाला.

- सप्तशृंगीदेवी गडावर ढगफुटीसदृश पावसामुळे गडाच्या पायऱ्यावर पाण्याचा लोंढा आल्याने पाच भाविक जखमी

- रेल्वेसह वाहतुकीवर पावसाचा विपरीत परिणाम

- नाशिक महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ आणि गाडगे महाराज धर्मशाळा येथे गोदावरीच्या पुरात अडकलेल्या ६५ जणांची महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुटका

- गोदाकाठ परिसरात चांदोरी, सायखेडा, शिंगवे या गावात पाणी शिरल्याने शेती पाण्याखाली

गिरणा नदीला प्रचंड पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची मका व ऊस ही पिके पाण्याखाली गेली आहेत. २००६ सालानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गिरणा नदीला महापूर आल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तत्काळ पाहणी करून नदी काठावरील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत जाहीर करावी.
कुबेर जाधव, शेतकरी, विठेवाडी, ता. देवळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com