Palghar Rain Update : पालघरमध्ये पावसाचा कहर

Monsoon Rain Update : शहरात उंच रस्ते, नवीन गटारे, नाले रुंदीकरण, कल्व्हर्ट व अन्य पावसाळी कामे हाती पूर्ण केली असली तरी पाणी साचण्यापासून बचाव झाला नसल्याचे दिसून येत आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Vasai News : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे वसई-विरार शहरातील अनेक मार्गावर बुधवारी (ता. १९) पाणी साचले आहे; तर नाले, गटारेदेखील भरून वाहू लागल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन केले गेले नाही, अशी टीका नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले होते.

वसई-विरार शहरात पावसाच्या आगमनापासूनच प्रशासनाची झोप उडाली आहे. शहरात उंच रस्ते, नवीन गटारे, नाले रुंदीकरण, कल्व्हर्ट व अन्य पावसाळी कामे हाती पूर्ण केली असली तरी पाणी साचण्यापासून बचाव झाला नसल्याचे दिसून येत आहे.

Rain Update
Jammu Rain Update : जम्मूमध्ये मुसळधार पाऊस; सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा

वसई सनसिटी, एव्हरशाईन, गोखिवरे, सोपारा, गास, उमराळे, नालासोपारा बस डेपो मार्ग, सातिवली, पेल्हार, संतोष भुवन, वालीव, नगिनदास पाडा, भुईगाव, वाघोली, बोळींज, खारोडी मार्ग, विरार, गिरीज यासह मुंबई-अहमदाबाद महामार्ग, नायगाव पूर्व यासह अन्य परिसरातील मार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन नेताना कसरत करावी लागली.

Rain Update
Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित

दुचाकी, चारचाकी वाहने बंद होत असून पाण्यातून चालत नेण्यासाठी प्रयत्न करताना चालकांची दमछाक होत आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर संपूर्ण वसई पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

२४ तासांत ४०० मिमी पावसाची नोंद

वसई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे दमदार आगमन झाले. पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणे जलमय झाली. वसईत गेल्या २४ तासांत ४०० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ५० मिमी पावसाची नोंद झाली. कृषी विभागाच्या संकेतस्थळावर पावसाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यामध्ये पालघर जिल्ह्यामधील पावसाची आकडेवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त पावसाची नोंद वसईतील विरार येथे १५३ मिमी झाली, तर सर्वांत कमी पावसाची नोंद खोडाळा येथे १६.४० मिमी झाली आहे. जिल्ह्यातील तालुक्यांत सरासरी ५० मिमी पावसाची नोंद आहे

पावसाळ्यासाठी नियोजनाचा अभाव आहे. पाणी साचणार नाही, असे प्रशासनाला वाटत होते, परंतु जनजीवन विस्कळित झाले आहे.
- समीर वर्तक, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग
पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते. महापालिका प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल.
- विलास तरे, माजी आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com