
ॲग्रोवन वृत्तसेवा
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात गत काही दिवसापासून पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लावत आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासात जालना व बीडमध्ये पावसाचा जोर (Rain) सर्वाधिक होता. या दोन जिल्ह्यातील आठ मंडलात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. औरंगाबाद जिल्ह्यात एका मंडलाचा अपवाद वगळता इतर सर्व मंडलात पावसाची हलकी, मध्यम हजेरी लावली.
जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४४ मंडलात हलका, मध्यम, दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दोन व जाफराबाद तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली. मंठा तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला . या तालुक्यात सरासरी ६८ मिलिमीटर इतका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडलात हलका मध्यम दमदार ते जोरदार पाऊस झाला. बीड तालुक्यातील २, पाटोदा तालुक्यातील २, गेवराई तालुक्यातील एक मंडल मिळून पाच मंडलात अतिवृष्टी झाली. बीड तालुक्यात सरासरी ४७, तर पाटोदा तालुक्यात सरासरी ४६ मिलिमीटर इतका पाऊस झाला. गेवराई तालुक्यातील काही मंडलात मध्यम ते दमदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५१ मंडलात तुरळक हलका पाऊस झाला. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३८ मंडलात तुरळक, हलका पाऊस नोंदल्या गेला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर कमीच होता. सतत होणारा पाऊस पुन्हा एकदा शेती पिकाच्या मुळावर उठला आहे. शेतात पाणी साचून नुकसान होत असतानाच गोदावरी सह इतर नद्यांना येणाऱ्या पुरामुळेही शेती पिकाचे मोठे नुकसान होत असल्याची स्थिती आहे.
जिल्हा निहाय पावसाची मंडल(पाऊस मिलिमिटरमध्ये)
औरंगाबाद जिल्हा : पैठण ५३, पाचोड ३४, विहामांडवा २४.५, गंगापूर ३६.५.
जालना जिल्हा : केदारखेडा ४८.८, जालना शहर २७.८, नेर ३५.५, शेवली २७ ,रामनगर ३७.३ ,पाचनवडगाव ६४.५.
जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी...
जाफराबाद, जि. जालना : जाफराबाद तालुक्यात अनेक गावांमध्ये अतिवृष्टी व अतिजोरदार पाऊस झाल्यामुळे शेतक-यांच्या शेतातील उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जाफराबाद, निमखेडा बु., रेपाळा, मेरखेडा, हारपाळा, जानेफळ, वरुड बु., खासगांव, भारज बु., आडा, पासोडी, सावरखेडा गोंधन, कुंभारी, विरखेडा भालके, आरतखेडा, वरखेडा विरो, टाकळी, गारखेडा, मंगरूळ, डोलखेडा, रूपखेडा, भरडखेडा, हनुमंत खेडा, ब्रह्मपुरी, सिपोराअंभोरा, देऊळझरी, आळंद, बोरखडी, हिवरा काबली, कुंभारझरी, काळेगाव, खानापूर, नळविहीरा, सावरगाव, व इतर अनेक गावांमध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी शिरले, त्यामुळे सोयाबीन, कपाशी, मका, ऊस, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अतिवृष्टीची मंडले
(पाऊस मिलिमीटरमध्ये)
जालना जिल्हा
कुंभारझरी ७७
मंठा ६६.३
तळणी १११.८
बीड जिल्हा
बीड ६५.५
चौसाळा ६९.५
पाटोदा ६८.३
दासखेड ६७
उमापूर ६५.८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.