Heavy Rain
Heavy Rain Agrowon

Heavy Rain Vidarbha : विदर्भात मुसळधार पाऊस

Nagpur Rain Update : चंद्रपूर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून गेल्या २४ तासांत तब्बल २४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Published on

Nagpur News : चंद्रपूर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून गेल्या २४ तासांत तब्बल २४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले होते.

पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात १४.२ इतका अत्यल्प पाऊस नोंदविण्यात आला. या भागातील नद्याही प्रवाहित झाल्या आहेत, ॅत्यासोबतच जिल्ह्यातील काही नाल्यांना पूर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील वाहतूक प्रभावित झाली आहे.

बुधवारी (ता.१९) तब्बल आठ मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामध्ये चांदाळा-कुंभी, रानमूल-माडेमूल, आलापल्ली-ताडगाव, अहेरी-मोयाबीन पेठा, आलापल्ली-भामरागड, लाहेरी बिना गुंडा, लाहेरी ते कुवाकुडी, अहेरी-आलापल्ली मुलचेरा घोट रस्ता, तळोदी आमगाव गट्टा या मार्गांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी १७ गेट ०.५० मीटरने उघडण्यात आले असून त्यातून २०२२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.

Heavy Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस

चिचडोह बॅरेजचे ३८ पैकी ३८ गेट उघडण्यात आले आहेत. त्यातून ९८८६ क्युसेक या प्रमाणे विसर्ग सुरू आहे. वडसा व वाघोली या सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

जरिवंडा तलावाची पाळ धसल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत आहे. बुधवारी पावसाचा वेग कमी झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४२ मिलिमीटरच्या पावसाची नोंद झाली. भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली.

वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू

अमरावती : चिखलदरा तालुक्यातील मोरगड शिवारात बजरंग भास्कर यांच्या शेतात कपाशी पिकात खुरपणीचे काम करणाऱ्या मजुरांवर वीज कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Heavy Rain
Konkan Rain Update : कोकण, पूर्वविदर्भात पावसाचा धुमाकूळ

बुधवारी (ता. १९) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुनील मोती भास्कर (वय ३५) व नीलेश बजरंग भास्कर (२२) या दोघांचा मृत्यू झाला. ललिता जांभेकर, पार्वती भास्कर (५०), ओमपती मेटकर (३०), आरती जांभेकर (२०), जानकी काळे (२४), सविता धांडेकर (२८), बजरंग भास्कर (४०), मीना भास्कर (३६) अशी जखमीं झालेल्यांची नावे आहेत.

गेल्या २४ तासातील पाऊस मिलिमीटरमध्ये

अकोला ५७.८

अमरावती २०.२

बुलडाणा ३२.०

ब्रह्मपुरी ६६.०

चंद्रपूर २४२.०

गडचिरोली १४.२

गोंदिया ३०.२

नागपूर १६.४

वर्धा ५३.८

वाशीम ५.१

यवतमाळ २६.२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com