Rain Update : नंदुरबारच्या काही भागास पावसाने झोडपले

Nandurbar Rain Update : दुबारची वेळ येईल की काय, अशी चिंता असतानाच बुधवारी (ता. ५) व गुरुवारी (ता.६) पावसाचे सर्वत्र आगमन झाले.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Nandurbar News : दुबारची वेळ येईल की काय, अशी चिंता असतानाच बुधवारी (ता. ५) व गुरुवारी (ता.६) पावसाचे सर्वत्र आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असून, पेरण्या पुढील आठवड्यात पूर्ण होतील, असे चित्र आहे.

जून संपल्यावरही पाऊस नव्हता. पूर्ण महिना कोरडा जातो की काय, असे साऱ्यांनाच वाटत असताना २९ जूनला आषाढी एकादशीला पांडुरंग पावले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्त हाकेला साद घालत वरुणराजाला बरसायला भाग पडले. त्या दिवशी सर्वत्र जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यातील पावसाळ्यातील पहिला पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शेतकऱ्यांनी कपाशीसह विविध खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरवात केली. पावसानंतर वातावरण मोकळे झाले होते.

Rain Update
Rain Update Parbhani : परभणी, हिंगोलीतील ७ मंडलांत अतिवृष्टी

पेरणीसाठी संधी दिली देवाने, असे म्हणत शेतकरी पेरणीत गुंतले. पेरणी झाली खरी, मात्र पावसाने पाठ फिरविली. गेले पाच दिवस पावसाचे वातावरणच नाही. उन्हाचा तडाखा जाणवत होता.

शेतकऱ्यांनी पेरणी तर केली मात्र पाऊस न झाल्यास ते बियाणे किडे खाऊन जातील, कोंब काढलेले बियाणे कोमेजून जाईल, त्यामुळे पुन्हा दुबार पेरणीची वेळ येते की काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला होता.

काहींची पेरणी आटोपली होती, काहींनी पेरणी थांबविली, तर काही मोठ्या हिमतीने पेरणी करतच होते. मात्र साऱ्यांचेच लक्ष आकाशाकडे होते. पाऊस यावा म्हणून शेतकरी आर्त हाक देत होते. त्यातच बुधवारी व गुरुवारी पाऊस झाला. पाऊस सुमारे दीड तास जोरदार बरसला. जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाला.

Rain Update
Maharashtra Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार

गेल्या तीन महिन्यांपासून अनेक गावे व शहरातील काही वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा पैसे देऊन खासगी टॅंकरद्वारे पाणी उपलब्ध करून काम भागवावे लागत होते.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी दुर्लक्ष करीत होते. त्यातच नंदुरबार शहरालगत अनधिकृत बोअरवेलधारकांवर व टॅंकरधारकांवर तहसीलदार पुलकित सिंह यांनी कारवाई केल्याने अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.

पाण्यासाठी टॅंकर मिळत नव्हते. काही लपूनछपून पाणीपुरवठा सुरू ठेवला होता. मात्र त्यांना मूह मांगे दाम द्यावा लागत होता. मात्र आषाढी एकादशीला झालेल्या पावसानंतर दोन-तीन दिवसांत बोअरवेलची काही अंशी पाणी पातळी वाढली.

त्यातून पिण्यापुरते का असेना पाणी येण्यास सुरवात झाली. या पावसामुळे आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com