Tapi Flood : तापीच्या महापुरात चार हजार हेक्टरवर पिकांची अतोनात हानी

Latest Agriculture News : तापीला दोन दिवस मोठा पूर होता. यात जिल्ह्यातील रावेर, जळगाव, चोपडा भागातील केळी, कापसाच्या शेतीला मोठा फटका बसला असून, कोट्यवधींची हानी झाली आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Jalgaon News : तापीला दोन दिवस मोठा पूर होता. यात जिल्ह्यातील रावेर, जळगाव, चोपडा भागातील केळी, कापसाच्या शेतीला मोठा फटका बसला असून, कोट्यवधींची हानी झाली आहे. चार तालुक्यांत चार हजार हेक्टरवरील केळी, कापसाचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यातील २१ गावांत हानी झाली. त्यात भुसावळ नजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे बॅकवॉटर शेतशिवारात शिरले.

यात रावेराती ऐनपूर, विटवा, निंबोल आदी गावांतील केळीचे नुकसान झाले आहे. पुढे जळगाव तालुक्यातील कठोरा, भादली, पळसोद, जामोद, रामेश्वर भागातही नदीकाठच्या शिवारात पुराचे पाणी शिरले. चोपडा तालुक्यात वटकार, वडगाव भागातही पुराचे पाणी शिवारात आल्याने कापूस, केळी पिकाची हानी झाली आहे. पुराचे पाणी ओसरले आहे.

पण त्यात मोठी हानी झाली. रावेर तालुक्यात केळी पिकाची सुमारे तीन हजार हेक्टरवर हानी झाली आहे. चोपडा, जळगाव व इतर भागात मिळून एक हजार हेक्टरवरील पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

Crop Damage
Raver Flood : रावेर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा

लहान व मोठ्या केळी बागा अक्षरशः ऐनपूर, निंबोल भागात पाण्यात बुडाल्या होत्या. वडगाव, सुटकार भागातही पिके पाण्याखाली गेली होती. कापूस पिकात पाण्यामुळे अधिकची हानी झाली आहे. पुराचे पाणी अजूनही शेतात साचले आहे. त्याचा निचरा झालेला नाही. ऊन पडल्यानंतर चार ते पाच दिवसांत पिकातून पाणी नाहीसे होईल. यादरम्यान हानी ७० ते ८० टक्के होईल. यामुळे प्रशाासनाने १०० टक्के पिकहानी पुराचे पाणी शिरलेल्या शिवारासंबंधी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.

Crop Damage
Wild Animal Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

पळसोद येथील रामेश्वर मंदिरालादेखील तापी नदीच्या पाण्याचा वेढा पडला. या नुकसानीसंबंधी प्रशासन तातडीने ई-पंचनामे करणार आहे. यानंतर नुकसानीचा अंदाज काढून भरपाईसंबंधी कार्यवाही केली जाईल. नुकसानीसंबंधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रावेर व इतर भागात पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून मदतीसंबंधी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

पुलाच्या भरावास धक्का

पावसामुळे तापी नदीवरील सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील बॅरेजनजीकच्या टाकरखेडा - सारंगखेडा पुलानजीकचा भराव काहीसा खचला आहे. मोठे भगदाड पुलानजीक पडल्याने रविवारी (ता. १७) या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. हा पूल बंद झाल्याने वाहतूक प्रकाशा (ता. शहादा) मार्गे वळविण्यात आली. पुलाचा भराव तातडीने व्यवस्थित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com