Biporjoy Cyclone : सौराष्ट्र, कच्छसह उत्तर गुजरातेत मुसळधार

Gujarat Rain Update : बिपॉरजॉय चक्रीवादळ पुढे सरकलेले असताना ३६ तासांनी सौराष्ट्र, कच्छसह उत्तर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Rain Update : बिपॉरजॉय चक्रीवादळ पुढे सरकलेले असताना ३६ तासांनी सौराष्ट्र, कच्छसह उत्तर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पालनपूर, थराद, बनासकांठा, पाटण, अंबाजी जिल्ह्यांतील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, शनिवारी (ता.१७) सकाळी कच्छ जिल्ह्यातील काही भागात व्यवहार सुरळीत सुरू झाले. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविल्याने आणि वीज पुरवठा सुरू केल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास हातभार लागला. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वादळग्रस्त भागाला भेट देण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे पाटण येथील गुजरातचे सर्वात मोठे चारणका सोलर प्लँटचे नुकसान झाले. दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे प्लँटमध्ये गुडघाभर पाणी झाले आहे. चक्रीवादळामुळे सोलर पॅनेल वाकले आहेत.

स्थानिक नद्यांना पूर आल्याने पाटणच्या शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. बनासकांठा जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१६) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बनास नदीचे पाणी आता आबू रस्त्यावर आले आहे. पालनपूर-अंबाजी महामार्ग बंद करण्यात आला आहे. डझनभर गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. पालनपूर शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.

शक्तिपीठ अंबाजी येथे पूरस्थिती असल्याने राजस्थान आणि गुजरातच्या भाविकांना परत जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे थराद शहरात ८० ते ९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे रस्त्यालगतचे होर्डिंग्ज पडले. विजेचे खांबही कोसळले. शहरातील बहुतांश भागात पाणी साचले आहे.

Rain Update
Cyclone Biporjoy Update : बिपॉरजॉय चक्रीवादळाचा गुजरातमध्ये हाहाकार, पिकांसह, जनावरे गेली वाहून

मदतकार्य युद्धपातळीवर

बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, मोरबी, जुनागढ, गीर सोमनाथ, राजकोट आणि पोरबंदर येथे वीजसेवा सुरळीत करण्यासाठी ११२७ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

Rain Update
Monsoon 2023: माॅन्सून कुठे अडकला? माॅन्सूनचा प्रवास आणखी किती दिवस रखडणार?

त्याचवेळी चक्रीवादळामुळे रस्त्यावर पडलेली सुमारे ५८१ झाडे बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली. बिपॉरजॉयच्या तडाख्यातून वाचण्यासाठी कच्छ जिल्ह्यातील सुमारे एक लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ८.३० वाजता बिपॉरजॉय चक्रीवादळ हे राजस्थानच्या दक्षिण बारमेरपासून ८० किलोमीटर अंतरावर होते. कच्छशिवाय द्वारका, बनासकांठा, पाटण येथे शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. शनिवारी सकाळी देखील बनासकांठा आणि पाटण येथे पाऊस सुरू होता.

गांधीनगर, अहमदाबादला पावसाचा इशारा

शनिवारी सकाळी सहा वाजल्यानंतर चार तासात संतालपूर, वाव, दांता, पोशिना तालुक्यात ४० ते ५० मिलिमीटरचा पाऊस पडला. बनासकांठा जिल्ह्याबरोबरच पाटण, मेहसाणा आणि कच्छ येथे आज (ता.१८) सकाळपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

गांधीनगर, अहमदाबाद, सुरेंद्रनगर, मोरबी जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या १ लाख ९ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यात ११ हजार मुले आणि पाच हजार ज्येष्ठ नागरिक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com