Akola Hailstorm : अकोला जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट

मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यातही जिल्ह्याला वादळी पाऊस, गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी पातूर तालुक्यात २० मिनिटे मोठी गारपीट झाली.
Hailstorm
HailstormAgrowon

Akola News मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यातही जिल्ह्याला वादळी पाऊस, गारपिटीचा (Hailstorm) जोरदार तडाखा बसला. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी पातूर तालुक्यात २० मिनिटे मोठी गारपीट झाली. जिल्ह्यात इतर ठिकाणीही वादळी पाऊस झाला.

सलग तिसऱ्या दिवशी बार्शीटाकळी व पातूर तालुक्यांना गारपिटीने झोडपले. जिल्ह्यात गुरुवारी पावसाने थैमान घातले. पातूर व बार्शीटाकाळी तालुक्यात यामुळे पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले.

Hailstorm
Crop Damage : खानदेशात वादळी पाऊस, गारपिटीने पिकांची हानी

जिल्ह्यात सात ते नऊ एप्रिल यादरम्यान वादळी पावसासह व गारपीट झाली आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका फळबागांसह रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांनाही बसला. उन्हाळ्यात पाचव्यांदा वादळी पाऊस झाला.

मंगळवारी (ता. २५) आणि बुधवारी (ता. २६) अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी (ता. २७) पुन्हा पातूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बाळापूर व अकोला शहरांसह तालुक्यात पाऊस झाला. यात हातरूण, अमानतपूर, बादलापूर, कंचनपूर, लोणाग्रा, मालवाडा, शिंगोलीचा समावेश आहे.

Hailstorm
Hailstorm Crop Damage : परभणीत गारपिटीमुळे पिके हातातून गेली

बार्शीटाकाळी तालुक्यातील पिंजर, धाबा, सायखेड, राजणखेड, लोहगड, चलका, निंबी, धामनदरी, कोथळी, कान्हेरी सरप, विझोरा येथे पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आंबा, कलिंगड, खरबूज, पपई, संत्रा, मोसंबी, कांदा, लिंबाचे नुकसान झाले.

महिनाभरात ८७६५ हेक्टरचे नुकसान

अकोला जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तब्बल ८७६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात लिंबू, भुईमूग, कांदा, गहू, हरभरा व भाजीपालावर्गीय पिकांचा समावेश आहे. अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर या तालुक्यांना पावसाने अधिक फटका दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com