Nashik Hailstorm News : सटाणा तालुक्यात सलग चौथ्या दिवशी गारपीट

सटाणा तालुक्यातील करंजाड परिसरातील निताणे, बिजोटे व आखतवाडेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आटोपल्यानंतर तालुक्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह वादळी वारा, गारपीट व जोरदार पाऊस झाला.
Hailstorm
HailstormAgrowon

Nashik Weather News : जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या गारपिटीने (Hailstorm) दाणादाण उडाली आहे. असे असताना सलग चौथ्या दिवशी सोमवारी (ता.१०) गारपिटीचा कहर सुरूच राहिला. सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणेसह जोरण परिसराला गारपिटीने पुन्हा झोडपले. त्यामुळे मोठे नुकसान (Crop Damage) होऊन कांदा मातीमोल झाला.

सटाणा तालुक्यातील करंजाड परिसरातील निताणे, बिजोटे व आखतवाडेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आटोपल्यानंतर तालुक्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह वादळी वारा, गारपीट व जोरदार पाऊस झाला. सुपारीच्या आकाराच्या गारपिटीने शेतकरी पुरता कोलमडला आहे. आरम खोऱ्यातील सोन्यासारखी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

Hailstorm
Crop Damage In Paithan : पैठणमधील लोहगावात वादळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान

सायंकाळी डांगसौंदाणेसह जोरण, किकवारी, कपालेश्वर, तळवाडे, साकोडे साल्हेर परिसरात जोरदार पाऊस झाला. तब्बल एक तासाहून अधिक वेळ झालेल्या या पावसाने उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान केले.

उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली. अनेक ठिकणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. सततच्या पावसाने टोमॅटो, मिरची, कलिंगड पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

Hailstorm
Rabi Crop Damage : खालापुरात पावसाचा रब्बी पिकांना फटका

सध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे कांद्यावरील प्लॅस्टिक ताडपत्री उडून गेली. त्यामुळे झाकलेला कांदा ओला झाला आहे. तर गारांचा तडाखा बसल्याने कांद्याला इजा झाली आहे.

अनेक भागांत हिरवी पात तुटल्याने कांद्याचे नुकसान होणार आहे. सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले आहे. तर मक्याचा साठवून ठेवलेला चारा पूर्णपणे भिजला आहे.

पश्चिम पट्ट्यात मोठी हानी

पेठ तालुक्यातील पेठ, कुळवंडी, घनशेत परिसरात गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रामुख्याने आंबा पिकासह भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. या गारपिटीने अतोनात नुकसान झाल्याचे शेतकरी यशवंत गावंडे यांनी कळविले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com