Crop Damage In Paithan : पैठणमधील लोहगावात वादळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान

लोहगाव महसूल मंडळात शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी वादळी विजांच्या कडकडाटात हलका व रात्री जोराचा अवकाळी पावसाने तिसऱ्यांदा रब्बी पिके, कांदा व फळझाडाना फटका बसला.
Crop Damage In Paithan
Crop Damage In PaithanAgrowon

Rain Update In Paithan : लोहगाव महसूल मंडळात शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी वादळी विजांच्या कडकडाटात हलका व रात्री जोराचा अवकाळी पावसाने तिसऱ्यांदा रब्बी पिके (Rabi Crop), कांदा (Onion) व फळझाडाना फटका बसला.

मुलानी वाडगाव शिवारात वीज कोसळून दोन जनावरे दगावली. या मंडळात दहा मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद पर्जन्यमापकात झाली आहे.

शुक्रवार (ता. ७) सायंकाळी लोहगाव महसूल मंडळात एकदम वातावरणात बदल होऊन वादळीवारा व विजांचा गडगडाट हलक्या पावसाला सुरवात होताच मुलानीवाडगाव शिवारातील गट नंबर ८५/४ मध्ये शेतात राहणारे राजू कल्याण बोडखे यांच्या घराच्या पाठीमागील गोठ्याजवळ बांधलेले गाय व बैलावर वीज कोसळून दोन जनावरे दगावली आहे.

Crop Damage In Paithan
Hailstorm Crop Damage : गारपीट, पावसामुळे ७२ तासांत ५० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

यामुळे शेतकऱ्यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा शनिवार (ता. ८) सकाळी तलाठी दिलीप कांबळे, दत्तात्रय पठाडे, हनिफ शेख, अप्पासाहेब तित्तर, भागचंद शेळके, नाथा भावले, ताराचंद शिरवत, ज्ञानेश्वर बोडखे, लक्ष्मण शेळके, सदाशिव मिसाळ, केदार शिरवत, यांच्या समक्ष पंचनामा करून अहवाल सादर केला आहे.

दरम्यान, मार्च महिन्यात दोन वेळा व आता तिसऱ्यांदा या मंडळात पावसाने रब्बी हंगामातील गहू हरभरा,ज्वारी, कांदा, मोसंबी, आंबा चिकू टरबूज खरबूज भाजीपाला फळांचे मोठे नुकसान झाले आहे.

शनिवार रविवारी ऊन ढंगाच्या छायेत झाकलेले पीक मोकळे करताना व राहिलेले कांदे कापणी करताना शेतकरी महिला मजुरांची लगबग सुरू असल्याचे चित्र परिसरात बघावयास मिळाले, तिसऱ्यांदा नुकसानीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना आतातरी सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर उघडे, सय्यद नजीर, सखाराम बोरुडे, पंढरीनाथ कदम, प्रभाकर तांबे, नामदेव तेजिनकर, विष्णू आगळे, आसाराम जगताप, धनंजय पाबळे, आसाराम सोनवणे, आदींनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com