Onion Export : केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात असंतोष वाढता; शेतकरी आक्रमक

Export Duty on Onion : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क नाशिक, कोल्हापूर, नगर जिल्ह्यांत शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्यात आले आहे.
onion Farmer
onion Farmer Agrowon
Published on
Updated on

Nashik Onion News : गेली चार महिने उन्हाळ कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही वसूल होत नव्हता. आता आवक कमी झाल्याने दरात सुधारणा झाली. अशा परिस्थितीत ग्राहकहिताला प्राधान्य देत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लादले आहे. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमधून असंतोषाचा भडका उडाला आहे. सोमवारी (ता. २१) नाशिक, कोल्हापूर, नगर जिल्ह्यांत शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्यात आले आहे.

दरम्यान जिल्ह्यात १५ बाजार समित्यांपैकी ११ बाजार समित्या कडकडीत बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान सोमवारी (ता. २१) दिंडोरी, येवला व निफाड तालुक्यांत असंतोषाची लाट उसळली होती. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळत संताप व्यक्त केला होता.

onion Farmer
Onion Export : कांदा निर्यात शुल्क वाढविल्याने ‘स्वाभिमानी’ आक्रमक

वणी (ता. दिंडोरी) येथे सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनानुसार शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी सकाळी ११ वाजता रास्तारोको केला. या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, संचालक गंगाधर निखाडे, स्वाभिमानी तालुकाध्यक्ष संदीप उफाडे यासह तालुक्यातील नेते पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करत केंद्राच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली. या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत व्यापारी देखील सहभागी झाले.

onion Farmer
Onion Export: कांद्याच्या निर्यातीसंबंधी वाणिज्य मंत्र्यांशी कृषिमंत्री मुंडे चर्चा करणार?|ॲग्रोवन

येवला येथे शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेने बाजार समितीसमोरील नगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या मांडुन रास्तारोको आंदोलन करत निषेध नोंदवला. सर्व शेतकऱ्यांचे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचे असून केंद्र सरकारने तातडीने ४० टक्के निर्यातशुल्क आकारणीचा अध्यादेश रद्द करावा अन्यथा शेतकरी लोकप्रतिनिधीना रस्त्यावर फिरू देणार नाही.

राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते संतु पाटील झांबरे, बाजार समिती संचालक संध्या पगारे, शेतकरी संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, जाफरभाई पठाण यांसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच निफाड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयावर धडक देऊन घोषणाबाजी करण्यात आली.

onion Farmer
Onion Export : कांदा निर्यात शुल्कावरून वाद चिघळणार, बाजार समित्या बेमुदत बंद राहणार
गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्यातशुल्क वाढीमुळे कांदा दर कोसळतील ही भीती व्यापारी आणि शेतकऱ्यांना असल्याने बेमुदत संप पुकारला आहे. ही संपाची कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार केंद्राशी चर्चा करणार आहे. शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी समन्वय साधून निर्णय घेऊ. शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही. शेतकऱ्यांच्या घामाला देखील दाम मिळायला हवे, ही भावना नागरिकांची देखील असायला हवी.
- दादा भुसे, पालकमंत्री
२०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार शेतमालाचे भाव पाडण्याचे धोरण राबवत आहे. एका बाजूला गव्हाचे आयात शुल्क संपूर्ण कमी केले. टोमॅटो परदेशातून आयात करण्यासाठी अनुदान दिले. दुसऱ्या बाजूला कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले. म्हणजे फक्त शेतीमालाचे भाव पाडायचे एवढेच धोरण केंद्र सरकारचे दिसत आहे. सरकारने असे निर्णय घेणे थांबवलं पाहिजे. तुमच्या अशा धोरणांना कंटाळून जर शेतकऱ्यांनी शेती करायचं सोडून दिले तर कारखान्यांमध्ये अन्नधान्य तयार करणार का?
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, राज्य बियाणे उपसमिती सदस्य खंडू बोडके-पाटील, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक राजेश पाटील यांसह शिवसैनिक उपस्थित होते. शासकीय विश्रागृहापासून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर धडक दिली.

विंचूर येथे चौफुलीवर जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. तर लासलगाव बाजार समितीमध्ये राज्य कांदा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, सचिव नरेंद्र वाढवणे यांना पत्र देण्यात आले. या वेळी अध्यक्ष भारत दिघोळे, युवक जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com