वाशी ः राज्यात सर्वत्र थंडी (Cold Weather) पडण्यास सुरुवात झाल्याने शेतमालासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडीतील पिकांसाठी उत्तम वातावरण असल्याने पिकेही चांगली वाढत आहेत.
त्यानुसार सध्या वाशीच्या एपीएमसीमध्ये (Washi APMC) स्टॉबेरी, अंजीरांची आवक (Strawberry, Fig Arrival ) वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ आंबडगोड द्राक्षांचीही आवक (Grape Arrival) सुरू झाल्याने या हंगामी फळांनी बाजार बहरला आहे.
वाशीच्या फळ बाजारात उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून परिणामी दरही नियंत्रणात आले आहेत. ग्राहकांकडून महाबळेश्वरपाठोपाठ वाई, जावळीपाठोपाठ नाशिकच्या स्ट्रॉबेरीला चांगली पंसती मिळत आहे. बाजरात स्ट्रॉबेरीचे दररोज आठ ते दहा टेम्पो बाजारात दाखल होत असल्याची माहिती फळ व्यापारी शिवाजी चव्हाण यांनी दिली.
सध्या घाऊक बाजारात सध्या ४० ते ५० क्विंटल अंजिराची आवक दररोज होत आहे. त्यांचे दरही समाधानकारक आहेत. घाऊक बाजारात ५० ते ६० रुपयांप्रमाणे उपलब्ध आहेत. आईस्क्रीम बनवण्यासाठीही ओल्या अंजिरांना मागणी वाढत आहे.
५० रुपयांना बॉक्स
सध्या एपीएमसीतील फळ बाजारात महाबळेश्वरसह वाई, जावळीपाठोपाठ नाशिकमधूनही स्ट्रॉबेरी बाजारात येत आहेत. बाजारात उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीचा एक बॉक्स ३५ रुपयांपासून ४० ते ५० रुपयांना मिळत आहे. आइस्क्रीम, केक, मिल्कशेक तसेच बासुंदीसाठी स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.