Team Agrowon
द्राक्ष घडातील मणी तडकणे ही टेबल आणि वाइन द्राक्ष उत्पादनातील एक मोठी समस्या आहे. या समस्येमुळे द्राक्षांची गुणवत्ता ढासळते, साठवणक्षमता कमी होते.
मणी तडकल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेत द्राक्षघड असलेल्या बागांमध्ये पाऊस झालेला असल्यास किंवा ढगाळ वातावरणामुळे मणी तडकण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते.
या तडकलेल्या मण्यांमुळे मणी सडण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे तडकलेल्या मण्यांवर माश्या किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
बागेत प्रत्येक घडामध्ये एक किंवा दोन मणी तडकलेले दिसत असल्यास असे मणी आधी काढून घ्यावे. ते बागेच्या बाहेर सुमारे दोन फूट खोल खड्ड्यात पुरावेत.
बागेत ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे २ ते ३ फवारण्या घेतल्यास फायदा होईल.