Chana Market : विदर्भ ठरतोय हरभरा उलाढालीचे केंद्र

सिंचनाच्या सोयीसुविधांअभावी विदर्भात सुरुवातीला रब्बीखालील पिकांचे क्षेत्र कमी होते. मात्र गेल्या काही वर्षांत सिंचनाच्या सोयी वाढल्याने रब्बी क्षेत्रातही वाढ नोंदविण्यात आली आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

सिंचनाच्या सोयीसुविधांअभावी विदर्भात सुरुवातीला रब्बीखालील पिकांचे (Rabi Crop) क्षेत्र कमी होते. मात्र गेल्या काही वर्षांत सिंचनाच्या सोयी वाढल्याने रब्बी क्षेत्रातही वाढ नोंदविण्यात आली आहे. अमरावती विभागात १६ वर्षांत या हंगामातील लागवडीखालील क्षेत्र अडीच लाख हेक्टरवरून सात लाख हेक्टरवर पोहोचले आहे.

Chana Market
Gram Panchayat Elections : निवडणुका उन्नतीचे की सत्ताकरणाचे साधन

त्यामध्ये हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अमरावती, दर्यापूर आणि अकोला या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल होते. रब्बी हंगामात दुबार पीक घेण्याची पद्धत अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. विहीर, बोरवेल यांसारख्या सिंचन सुविधांचा पर्याय शेतकऱ्यांनी उपलब्ध करून घेतला आहे. परिणामी, क्षेत्रवाढ नोंदविली गेली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

गहू लागवड

गव्हाचे सर्वाधिक ५५ हजार हेक्टर क्षेत्र बुलडाणा जिल्ह्यात आहे. अमरावती ४२ हजार ४९८ हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात २५ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड होते. हरभरा पिकाखालील एक लाख ४६,४३८ हेक्टर क्षेत्र बुलढाणा जिल्ह्यात असून, त्या पाठोपाठ एक लाख १६ हजार ११७, यवतमाळ एक लाख ४ हजार ३८९, अमरावती ९४ हजार ६७८, अकोला ६०८४३ हेक्टर वाशिम क्षेत्रावर हरभरा लागवड होते. पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये धान (भात) लागवड होत असल्याने रब्बी क्षेत्र कमी राहते.

बाजारपेठेत हरभरा आवक

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील हरभऱ्याची मोठी आवक होते. दर्यापूर तालुका हा खारपणपट्ट्यामध्ये समाविष्ट आहे. या भागातील हरभऱ्याला त्याच कारणामुळे वेगळी चव येत असल्याने उत्तर भारतातून याला सर्वाधिक मागणी राहते. दिल्ली बाजारपेठेत खारपाणपट्ट्यातील हरभरा म्हणून व्यापारी यास अधिकचा दर देतात असे सांगण्यात येते.

अमरावती, दर्यापूर, अकोला या बाजार समितीमध्ये त्या भागातील व्यापारी येऊन हा हरभरा खरेदी करतात. दर्यापूर बाजार समितीमध्ये २०१०-२० या वर्षी एक लाख ५५ हजार ३५५ क्विंटल आवक झाली. २०२०-२१ मध्ये त्यात दुपटीने म्हणजे दोन लाख ३८ हजार १६७ क्विंटल आवक नोंदवण्यात आली. सन २०२१-२२ मध्ये ही आवक एक लाख ६१ हजार ३८१ क्विंटल झाली असे बाजार समितीचे सचिव हिम्मतराव मातकर यांनी सांगितले. स्थानिक व्यापारी हरभरा खरेदी करतात. त्यानंतर या भागातून तो दिल्ली बाजारपेठेत पाठविला जातो.

अकोला बाजारपेठ

अकोला बाजार समितीमध्येही हरभऱ्याची मोठी उलाढाल होते. सन २०१९-२० मध्ये आवक दोन लाख ५ हजार ८६४ क्विंटल होती. २८०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. काबुली हरभऱ्याची आवक २५९२ क्विंटल झाली. त्यास ३३०० ते ५००० रुपये दर राहिला. २०२०-२१ मध्ये एक लाख ७७ हजार ६३६ क्विंटलहरभरा आवक व दर २५०० ते ६००० रुपये राहिला. याच वर्षी
काबुली हरभऱ्याची आवक १२७२ क्विंटल होती. त्यास २५०० ते ७००० रुपये दर मिळाला.

Chana Market
Cotton Production : कापूस उत्पादकतेत पिछाडीचे ‘सीआयसीआर’ जाणणार कारण

अमरावती बाजारपेठ

विदर्भात अमरावती बाजार समिती ही हरभरा उलाढालीचे मोठे हब मानली जाते. हंगामात दहा लाख क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक येथे होते असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. सन २०१९-२० या वर्षात आठ लाख २५ हजार ९३८ क्विंटल हरभरा आवक झाली. त्यास ४०३५ रुपये सरासरी दर मिळाला. सन २०२१-२२ मध्ये सुमारे पाच लाख साठ हजार पाचशे क्विंटल आवक व ४६१० रुपये दर मिळाल्याचे बाजार समिती सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यात सोयी अधिक असल्याने दुर्गम मेळघाटसह सर्वदूर हरभरा लागवड होते. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये रबी हंगामातील हरभऱ्याची सर्वाधिक आवक अमरावती बाजार समितीमध्ये होते. त्यामुळे हरभरा उलाढालीचे मोठे केंद्र नजीकच्या काळात हीच बाजार समिती झाली आहे. पंजाब, हरियाना, दिल्ली, राजस्थान यांसह उत्तर प्रदेशसह देशभरात मागणी असलेल्या राज्यांमध्ये या ठिकाणाहून हरभरा पाठविला जातो असे येथील व्यापारी सतीश अटल यांनी सांगितले.

संपर्क ः दीपक विजयकर
सचिव, बाजार समिती, अमरावती
मो. ९७६४२४९८५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com