Maharashtra Budget Session 2023 मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय असंवेदनशीलपणे काम करणारे सरकार (Eknath Shinde Government) अशी या सरकारची गणना करावी लागेल. कोडगेपणाचा कळस या अधिवेशनात पाहायला मिळाला, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (ता.२५) विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार घातल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच राज्यात अतिवृष्टी, गारपीट आणि अन्य संकटांनी शेतकरी त्रस्त असताना सरकार निष्ठुर आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
श्री. पवार म्हणाले,‘‘माझ्याच नव्हे तर अन्य ज्येष्ठ आमदारांच्या राजकीय कारकिर्दीत असे अधिवेशन असेल की ज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची उपस्थिती नगण्य होती. अनेकदा सभागृहात कोरम नसतानाही सभागृह चालविले. विधानसभा आणि परिषदेत २९२ आणि २०३ (३) चे उत्तर आज दिले जात आहे.
हे बेजबाबदारपणाचे वर्तन आहे. सरकारला गांभीर्य नाही. मंत्री सभागृहात नसतानाही सभागृह चालविले जात होते. असे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. या मंत्र्यांना सरकारी बंगला, गाडी, सुरक्षा हवे पण काम करायला नको. सत्ताधारी आमदारांनीही नाराजी व्यक्त केली.
ही अनास्था गंभीर धोका आहे. मागील अधिवेशनातील बैठकाही घेतल्या नाहीत. राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, पंचनामे झाले नाहीत. पीकविमा मिळालेला नाही, लाँग मार्चच्या नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले हेही कुणाला माहीत नाही.
अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव नाही, शेतकरी मरत असताना विधीमंडळाच्या आवारात मात्र गाण्यांचे कार्यक्रम होतात, मेजवान्या होत आहेत. ही बाब महाराष्ट्राला शोभणारी नाही.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.