APMC Election : शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष हातात हात घालून ताकदीने लढतील. विजयासाठी वेळ दिला पाहिजे.
apmc election
apmc electionAgrowon

Pune News दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) भारतीय जनता पक्ष (BJP) व मित्र पक्ष हातात हात घालून ताकदीने लढतील. विजयासाठी वेळ दिला पाहिजे. सर्वानुमते उमेदवार दिला जाईल. त्या सर्व उमेदवारांचे काम पक्षादेश मानून केले पाहिजे,’’ असे आवाहन आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी चौफुला (ता. दौंड) येथील भाजपच्या मेळाव्यात व्यक्त केले.

या वेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर, नीलकंठ शितोळे, आनंद थोरात, शिव संग्रामचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंके, अप्पासाहेब हंडाळ, शोभा शेळके, तुकाराम ताकवणे, पंढरीनाथ पासलकर, राजकुमार मोटे, संजय इनामके, गोरख दिवेकर, ज्ञानदेव शेळके, लक्ष्मण रांधवण, अशोक हंडाळ, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

apmc election
Beed Apmc Election : बीड जिल्ह्यात नऊ बाजार समित्यांची एकदाच निवडणूक

कुल म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायतस्तरावरील मतदार संघात आपल्याला चांगले यश मिळाले आहे. सोसायटी मतदार संघात आपली परिस्थिती सुधारली आहे. आता गाफिल न राहता आपण सर्वांनी खांद्याला खांदा देऊन लढले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने दौंड बाजार समिती नावारूपाला आणू.’’

apmc election
Gadhinglaj Market Committee Election : गडहिंग्लज बाजार समितीत भाजप-शिंदे गट एकत्र

प्रेमसुख कटारिया म्हणाले, ‘‘दौंड बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. निवडणुकीत जय-पराजयापेक्षा टक्कर देणे महत्त्वाचे आहे. विकासकामांवरील लक्ष विचलित करण्यासाठी भीमा पाटसचा मुद्दा उपस्थित केला जातो हे दुर्दैवी आहे.’’

वासुदेव काळे म्हणाले, ‘‘केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. या संधीचा फायदा घेत बाजार समितीचा विकास साधायचा असेल तर दौंड बाजार समितीत सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार मोडीत काढला आहे. राष्ट्रवादीला हरविण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या निवडणुकीत ताकदीने लढले पाहिजे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com