Gadhinglaj Market Committee Election : गडहिंग्लज बाजार समितीत भाजप-शिंदे गट एकत्र

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. ३०) दुपारी भाजपचे पदाधिकारी व शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Gadhinglaj Market Committee Election
Gadhinglaj Market Committee ElectionAgrowon

Gadhinglaj Market Committee Election Update : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप (BJP) व शिवसेना (शिंदे गट) (shivsena Shinde Gat) एकत्रितपणे लढणार आहेत.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धारही या वेळी झाला.

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. ३०) दुपारी भाजपचे पदाधिकारी व शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला.

Gadhinglaj Market Committee Election
Jalgaon Dairy : महाविकास, भाजप, शिंदे गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न

शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत कोलेकर, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत, भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, अनिल खोत, मारुती राक्षे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर, तालुकाप्रमुख संजय संकपाळ, प्रदीप चव्हाण, अशोक शिंदे, चंदगड तालुकाप्रमुख नितीन पाटील, परशुराम पाटील, बाबू नेसरीकर, कल्लाप्पा नेवगिरे, यल्लाप्पा पाटील, विनोद पाटील, किरण कोकितकर, दत्तात्रय खराडे, संजय चौगुले उपस्थित होते.

तत्पूर्वी, भाजपची हॉटेल मल्हारच्या सभागृहात बैठक झाली. गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. मार्तंड जरळी यांनी प्रास्ताविकात बाजार समितीच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली.

संग्रामसिंह कुपेकर, ॲड. हेमंत कोलेकर, चंद्रकांत सावंत, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे यांनी सूचना मांडल्या. पक्षाने बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढवावी.

Gadhinglaj Market Committee Election
शिंदे गट उद्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांना पाठवणार

तथापि, आर्थिक परिस्थितीचा विचार करता बाजार समितीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रसंगी बिनविरोधसाठी पुढाकार घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश पाटील, मारुती राक्षे, अनिल खोत, रवी शेंडुरे, संदीप पाटील, संदीप रोटे, अमित देशपांडे, दत्तात्रय नाईक, युवराज पाटील, संतोष नाईक, मारुती तेरणी, सागर अस्वले, राजू मिरजेंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com