Inflation Controls : महागाई नियंत्रणासाठी सरकार गहू, तांदूळ खुल्या बाजारात विकणार

Central Government : गृहपयोगी अनेक वस्तूंचे दर वाढल्याने सामान्यांचे बजेट कोलमडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
Inflation Controls
Inflation ControlsAgrowon

Rice and Wheat Rate : मागच्या काही महिन्यांपासून गृहपयोगी अनेक वस्तूंचे दर वाढल्याने सामान्यांचे बजेट कोलमडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून सरकार ठोस पावले उचलत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार ५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदळाची खुल्या बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर कालपासून टोमॅटोच्या दरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर नाफेड मार्फत राखीव साठ्यातून ३ लाख मेट्रिक इतका कांदा बाजारात आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती अन्नधान्य विभागाचे सचिव संजीव चोपडा यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, हल्ली गहू आणि तांदळाच्या किमतींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. याचा विचार करून सरकारने खुल्या बाजारात अधिक गहू आणि तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात कॉफी बीन्सचे उत्पादन अत्यंत कमी झाले आहे.

सर्वात जास्त पिकणाऱ्या ब्राझील आणि व्हिएतनाममध्ये खराब हवामानामुळे कॉफीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कॉफीचे दर भडकले आहेत. सध्या कॉफी प्रतिकिलो ५८० प्रतिकिलोवरून ६५० रुपयांवर पोहचली आहे.

याचबरोबर मागच्या तीन महिन्यांपासून टोमॅटोने देशभरात उच्चांक गाठला होता यावर सरकारने कमी दरात टोमॅटो खरेदीकरून टोमॅटो दरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. याचबरोबर आवक वाढूनही कांद्याचे दर एका महिन्यात २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात लासलगावच्या बाजारात परवा कांद्याला ठोक भाव प्रति क्विटल १,३७० रुपये इतका मिळाला. तोच शुक्रवारी १,७५० प्रति क्विंटलवर पोहचला आहे.

दर नियंत्रणासाठी सरकारने राखीव साठ्यातून ३ लाख मेट्रिक इतका कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या संचालकांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

Inflation Controls
Earthquake kolhapur : कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, चांदोली अभयारण्य केंद्रबिंदू

काळी मिरी आणखी महाग

कर्नाटक आणि केरळमध्ये अवकाळी पावसामुळे काळ्या मिरीचे उत्पादन येण्यास उशिर लागणार आहे. काळ्या मिरीची किमत सध्या बाजारात ६२५ रुपये प्रतिकिलोवर पोहचली आहे. हीच किंमत आधी ४८० रुपये प्रतिकिलो इतकी होती. जिरे, धने, हळदीच्या किमतीही आधीच मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com