milk collection
milk collection Agrowon

Milk Collection Center : नांदेडला शासकीय दूध संकलन बंद

Dairy Industry : नांदेडला पशुपालकांकडून पुरवठा होत नसल्याने शासकीय दूध संकलन बंद करण्यात आले आहे.
Published on

Nanded News : नांदेडला पशुपालकांकडून पुरवठा होत नसल्याने शासकीय दूध संकलन बंद करण्यात आले आहे. तर राष्ट्रीय दूध विकास बोर्डसह (एनडीडीबी) खासगी डेअरीचे संकलण सध्या दररोज ४४ हजार लिटर आहे. या खासगी डेअरीकडून गायीच्या दूधाला ३४ रुपये तर म्हसीच्या दूधाला ४६ रुपये दर मिळत आहे. असल्याची माहिती जिल्हा दुग्धविकास अधिकारी कार्यालयाकडून मिळाली.

milk collection
Milk Rate : कोल्हापुरात बागायती पट्ट्यातील दूध उत्पादक मेटाकुटीला

पशूपालकांना दुधाचा दर चांगला मिळावा, यासाठी शासनाने नुकतीच गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २५ रुपयावरुन ३४ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. परंतु नांदेडला शासकीय दूध संकलन मागील दोन-तीन वर्षांपासून पूर्णत: बंद आहे.

मदर डेअरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय दूध विकास बोर्डसह (एनडीडीबी), अमूल (वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ), साईकृपा डेअरी, हरीटेज डेअरी, नमस्कार डेअरी या दूध संकलन डेअरीकडून दररोज ४४ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते.

milk collection
Milk Rate : कशी फुटेल दूधदर कोंडी?

यात सर्वाधिक दूध अमूलकडून (वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) २४ हजार लिटर दूध संकलित होते. तर राष्ट्रीय दूध विकास बोर्डकडून (एनडीडीबी) साडेसात हजार लिटर, साईकृपा डेअरी सिंधी (ता. उमरी) पाच हजार ८१८ लिटर, हरीटेज डेअरी ६४६६ लिटर, नमस्कार डेअरी २०१९ लिटर असे एकूण ४४ हजार लिटर दूध दररोज संकलित होते. या दुधाला फॅट तसेच एसएनएफनुसार दर दिला जातो.

या गायीच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर प्रमाणे दूध संकलित केले जाते. तर मदर डेअरीकडून गायीच्या (३.५, ८.५) दुधाला ३४ रुपये, तर म्हशीच्या दुधाला (६.०, ९.०) ४५ रुपये प्रतिलिटर दूधदर दिला जातो. अमूल (वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ)कडून गायीच्या (३.५, ८.५) दुधाला ३५.६० रुपये, तर म्हशीच्या (६.०, ९.०) दुधाला ४९.९० रुपये प्रतिलिटर दूध दिले जाते, अशी माहिती अमूलच्या वितरण व्यवस्थापकांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com