Rain Update : वऱ्हाडात पावसाची दिलासादायक हजेरी

Latest Rain News : यंदा मॉन्सून सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला तरी पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये पावसाने सातत्याने हुलकावणी दिली होती.
Kharif Season
Kharif Season Agrowon
Published on: 
Updated on: 

Akola News : यंदा मॉन्सून सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला तरी पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये पावसाने सातत्याने हुलकावणी दिली होती. अखेरीस बुधवारी (ता. ५) या जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दिलासादायक हजेरी लावली. या पावसामुळे आता खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. गुरुवारी (ता.६) मात्र वातावरण मोकळे झालेले होते.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कुठे पाऊस तर कुठे कडक ऊन अशी परिस्थिती होती. सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षाच कायम होती. अखेरीस बुधवारी अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी, अकोला,पातूर, मूर्तिजापूर, आदी तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.

दुपारपासून रात्री आठ वाजेपर्यंत हा पाऊस भाग बदलून पडत होता. यापूर्वी पेरणी झालेल्या क्षेत्राला या पावसाने मोठा दिलासा मिळणार आहे. पातूर तालुक्यात २७.८, बाळापूर ११.८, अकोला ८.७, बार्शीटाकळी ६.२, मूर्तिजापूर २.२, अकोट १.८, तेल्हारा ४.१ अशी नोंद झाली.

Kharif Season
Nagar Kharif Sowing : नगर जिल्ह्यात खरिपाची अवघी साडेचार टक्के पेरणी

वाशीम जिल्ह्यात जोरदार हजेरी

पावसाने या जिल्ह्यात बुधवारी दमदार हजेरी लावली. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर या तालुक्यांतील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. कारंजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत दमदार पाऊस झाला. या तालुक्यात जून महिन्यात दोन-तीन दिवस पडलेल्या साधारण पावसावर बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. हे सर्व शेतकरी पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करू लागले होते.

अशातच मंगळवारी (ता. ४) दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन धो-धो पाऊस झाला. नदी-नाल्यांना पाणी वाहले. पोहा येथील उमा नदी दुथडी भरून वाहिल्याने पुलावरून पाणी गेले. येवता बंदी येथे नाल्याला पूर आल्याने बैलगाडी पलटी झाली.

या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. वडगाव इजारा येथील नाला दुथडी भरून वाहला. बुधवारीही या तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यात वाशीमसह रिसोड, मालेगाव तालुक्यांत बुधवारी पावसाने मोठा दिलासा दिला. गेल्या २४ तासांत वाशीम जिल्ह्यात मालेगावमध्ये सर्वाधिक ३५.४ मिली, वाशीम २२.६, मंगरूळपीर २२.४, रिसोड १५.५, मानोरा १२.७, कारंजा ४.७ मिली पाऊस नोंद झाली.

Kharif Season
Nagar Rain News : भंडारदऱ्यातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ

बुलडाणा जिल्ह्यातही पावसाची हजेरी

बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्यापही सार्वत्रिक पावसाअभावी पेरण्यांना अपेक्षित वेग आलेला नाही. खामगाव गेले दोन दिवस पाऊस दमदार बरसला.

कारसारखेडच्‍या पुलाची दुरवस्‍था झाली असून, पोरज, ढोरपगाव या भागांतील छोट्या नद्या व नाल्‍यांना पूर वाहला. पिंपळगाव राजा, ढोरपगाव, पोरज, निमकवळा, निपाना, तांदुळवाडी या भागात मागील दोन दिवसात चांगला पाऊल झाला.

बुलडाणा जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस

मलकापूर ५०.७, सिंदखेडराजा ४२.५, लोणार ३६.७, मोताळा ३६.६, खामगाव ३१.२, चिखली २७.६, बुलडाणा २४.१, मेहकर १९.२, देऊळगावराजा १२, शेगाव ९.३, संग्रामपूर ९.३, नांदुरा ६.७, जळगाव जामोद ४.९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.