Nagar Kharif Sowing : नगर जिल्ह्यात खरिपाची अवघी साडेचार टक्के पेरणी

Nagar Sowing : आतापर्यंत खरिपाच्या सरासरीच्या अवघ्या साडेचार टक्के म्हणजे वीस हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Kharif Sowing : नगर : पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा उसंत घेतल्याने नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या (Kharif Sowing) लांबणीवर चालल्या आहेत. आतापर्यंत खरिपाच्या सरासरीच्या अवघ्या साडेचार टक्के म्हणजे वीस हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.  

नगर जिल्ह्यामध्ये यंदा नेहमीच्या तुलनेत पंधरा दिवस उशिराने पाऊस सुरू झाला. त्यातही पाऊस सुरू झाल्यानंतर आता पुन्हा चार-पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. एक तर खरिपाच्या पेरण्याला उशीर होत असताना पाऊस थांबल्यामुळे पेरण्याही थांबल्या आहेत.

कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ साडेचार टक्के पेरण्या झाल्या असून पाऊस नसल्याने पेरण्यालाही उशीर होत आहे. खरिपातील प्रमुख पीक असलेली बाजरी, सोयाबीनची पेरणी व कापसाची फारशी लागवड झालेली दिसत नाही.

Kharif Sowing
Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात

सोयाबीन कापसाचे आतापर्यंत केवळ दहा टक्के क्षेत्र फिरले गेले आहे. उशीर झाला असल्यामुळे खरिपातील मूग, उडदाची पेरणी आता होणे शक्य नाही.

असाच आणखी उशीर होत गेला तर बाजरी, तूर, कापसाच्या लागवडीवर हे परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. पाऊस नसल्यामुळे बियाण्यांची ही फारशी विक्री होताना दिसत नाही. ज्या पिकाला पेरणीसाठी उशीर झाला आहे,

पीकनिहाय पेरणी भात ० (१४०३६) खरीप ज्वारी ९ (१६६६) बाजरी १७३९ (१४०८१२) रागी/नागली ६८९ (०) मका १५८० (३२५७०) तूर २४८४ (१५१२१) मूग २१३ (४०३७८) उडीद ११७ (१७५९६) भुईमूग १५५ (७४३०) तीळ ० (१००) कारळे ० (८७४) सूर्यफूल ० (५३४) सोयाबीन १०५० (५४२९४) कापूस ११९९६ (११४३९२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com