Farmer Subsidy : खुशखबर ! ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वर्ग

Crop Damage Compensation : गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता ई-केवायसी केलेल्या राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१० कोटी ३० लाख रुपयांच्या मदतीचा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते सुरु करण्यात आली.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon

Ativrushti Nuksan Bharpai : गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष बाब म्हणून १ हजार ५०० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

या अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला. सोमवारी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते संगणकीय प्रणालीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करण्यात आला.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : पावसाच्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

गेल्या वर्षी खरीप हंगामात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून १ हजार ५०० कोटी रुपये इतका निधी मंजूर केला होता. त्या अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला.

या निधीचे मदत व पुनर्वसन विभागाच्या डीबीटी प्रणालीमार्फत वितरण सुरु आहे. सोमवारी मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या निधी वितरणाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ई – केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली.

हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. तसेच पुढील शुक्रवारपर्यंत आणखी २ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १७८ कोटी २५ लाख इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

तसेच शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना देखील सर्व तहसील ब जिल्हा यंत्रणांना मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या. त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानाकरिता तातडीने मदत मिळावी यासाठी, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई – केवायसी करण्याचे शेतकऱ्यांना अनिल पाटील यांनी आवाहन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com