Crop Damage Compensation : पावसाच्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Heavy Rain Crop Damage : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Latest Agriculture Update : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी.

यासाठी पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. अद्याप या प्रस्तावानुसार शासनाने निधी मंजूर केला नाही. त्यामुळे शेतकरी मदतीची आस लावून बसले आहेत.

Crop Damage
Crop Damage Compensation : एक लाख ९५ हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

मागील हंगामात जून, सप्टेंबर दरम्यान प्रचंड पाऊस झाला होता. त्यावेळी खरीप हंगामातील उत्पादन प्रचंड घटले होते. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचाही पिकांना फटका बसला.

मार्च महिन्यात ६ ते १९ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे गहू, कांदा, रब्बी हंगामातील अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले

Crop Damage
Crop Damage Compensation : मागणी २२ कोटींची, मात्र ८.७ कोटी मंजूर

होते. गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करून शासनास प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले होते.

त्यानुसार ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी यांनी पंचनामे करून शासनास प्रस्ताव पाठविला आहे. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र,जून महिना संपला असला तरी भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी मदतीची आस लावून बसले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com