Godavari Flood : ‘गोदावरी’ला आला पूर

पुराचे पाणी नदी पात्रात विस्तीर्ण पसरल्याने नदी काठच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Godavari Flood
Godavari FloodAgrowon
Published on
Updated on

कायगाव, जि. औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी जुने कायगाव (ता. गंगापूर) येथील गोदावरी नदीत (Godavari River) मंगळवारी (ता.१२) पहाटे पाचच्या दरम्यान पोहचले. आता ते जायकवाडी जलाशयाकडे (Jaykawadi Reservoir) वेगाने झेपावले आहे. पुराचे पाणी नदी पात्रात विस्तीर्ण पसरल्याने नदी काठच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुराचा (Flood) संभाव्य धोका टाळण्यासाठी तालुका प्रशासकीय यंत्रणेने नदी काठच्या लोकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Godavari Flood
‘दुष्काळातील पावसाचा थेंबः गोदावरी डांगे'ची कथा

कायगाव व परिसरातील गावांत चार-पाच दिवसांपासून सततच्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतकरी, नागरिक आणि पशुधनाचे भीज पावसाने मोठे हाल होत आहेत. अशातच नाशिकच्या धरणातून विसर्ग करण्यात आला. हे पाणी सुसाट वेगाने जायकवाडी धरणाकडे प्रवाहित झाले आहे. मंगळवारी (ता.१२) सकाळी १० वाजता नागमठाण येथून गोदावरी नदीत ५६६०० क्यूसेस पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे चंद्रकांत हिवाळे यांनी दिली.

जुने कायगाव येथील वाहतुकीस बंद पडलेल्या जुन्या पुलाजवळील गोदावरी घाटाच्या पायऱ्या पाण्यात बुडाल्या आहेत. नदी पात्र ओव्हरफ्लो झाले आहे. संपादित क्षेत्रातील शेत शिवार जलमय झाले आहे.

Godavari Flood
गोदावरी प्रदूषित करण्याऱ्या कंपन्यांविरुद्ध करणार कारवाई

पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ

पुराचे पाणी आल्याने जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. यासाठी ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार सतीश सोनी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी केले आहे. नदी काठावरील जुने कायगाव, अमळनेर वस्ती, जुने लखमापूर येथील शेतकऱ्यांना सुरक्षितस्थळी पोहचावे, असे आवाहन करण्यात आले.

गंगथंडी भागातील नेवरगाव, जुने जामगाव, जुने कायगाव, अमळनेर वस्ती, जुने लखमापूर, धनगरपट्टी, जुने गळनिंब भागांत मंगळवारी नदी पात्रातील कृषी पंपांचे पाइप, विद्युत मोटारी, केबल, मोटारीची खोकी सुरक्षितस्थळी नेण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. पावसात भिजत चिखल तुडवीत अनेकांनी आपली शेती अवजारे, कृषिपंप, पशुधन, संसारोपयोगी वस्तू ,जनावरांचा हिरवा चारा कापून पुराचा धोका असलेल्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी नेला.

गोदावरी नदी काठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी. शेतात जाण्यासाठी नदी रस्त्याचा उपयोग करू नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
सतीश सोनी, तहसीलदार, गंगापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com