Crop Insurance : नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना द्या

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Natural calamity) व काढणीपश्चात नुकसान (Post Harvesting Damage) या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस (Crop Damage Intimation) देणे अनिवार्य आहे.

Crop Damage
Crop Insurance : पिकांचे पंचनामे करा

त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

Crop Damage
Crop Insurance : पीकविमा, मदतीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको

याबाबत श्री. डाबरे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, मका व ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी Crop Insurance App वर नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी व पिकांची स्थिती नमूद करणे अनिवार्य आहे.

नुकसानीची माहिती भरताना पुढील काळजी घ्यावी...

Standing Crop Harvested व Cut & Spread Bundled For Drying असे पर्याय दिलेले असून, त्यापैकी Cut & Spread / Bundled For Drying हा पर्याय निवडावा.

नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के नमूद करावी.

कापूस व तूर या पिकांचे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calimity) या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी.

पिकाची स्थिती (Status Of Crop At The Time Of Incidence) Standing Crop हा पर्याय निवडावा.

नुकसानीची टक्केवारी ही प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात नमूद करावी.

प्रत्येक गटातील प्रत्येक पिकांसाठी स्वतंत्रपणे तक्रार दाखल करावी.

तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार क्रमांक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येईल.

सदरील तक्रार क्रमांक जतन करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com