Radhakrushna Vikhe Patil : 'गायरान जमीनीवर घरे बांधणाऱ्यांना रस्त्यावर आणणार नाही', राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला शब्द

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गायरान जमीनीवरील बांधण्यात आलेल्या घरामधील हजारो गोरगरीब कुटूंबाचा मोर्चा काढण्यात आला.
Raju Shetti
Raju Shettiagrowon

Gayran Land : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज (ता.१९) गायरान जमीनीवरील बांधण्यात आलेल्या घरामधील हजारो गोरगरीब कुटूंबाचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आझाद मैदान येथून विधानभवनावर काढण्यात आला. यावेळी हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान यावर राधाकृष्ण विखे पाटील यांना शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून करोडो-लाखो गरीब लोक हे भूमिहिन आहेत. इंग्रज सरकारने, हैद्राबाद नवाबाने सुध्दा गोरगरीब लोकांना सरकारी जमिनी, वतने, इनाम सोबतच दिलेल्या होत्या तेच लोक आज अतिक्रमणधारक महाराष्ट्र सरकारने ठरविले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जवळपास साडेपाच लाख कुटूंबे ही स्वतःच्या राहत्या घरात आहेत. राज्यातील या लाखो गोरगरीब भुमिहिनांना अतिक्रमणधारक ठरवत आहेत.

याऊलट राज्यातील राज्यकर्त्यांनी हजारो एकर गायरान जमीनी सुतगिरणी , साखर कारखाने ,शैक्षणिक संस्था , औद्योगिक वसाहती याकरिता बळकावून त्या विकून हजारो कोटी रूपयाची लुबाडणूक केली आहे. त्याची चौकशी करून त्या पहिल्यांदा ताब्यात घेण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली.

Raju Shetti
Raju Shetti : राजू शेट्टींचे विखे पाटलांना प्रत्त्युत्तर

राज्यातील गायरान जमीनीवरील बांधण्यात आलेल्या घरामधील गोरगरीब कुटूंबाना आम्ही रस्त्यावर आणणार नाही. याउलट सदर अतिक्रमणे नियमानूकूल कशापध्दतीने होतील यासाठी प्रयत्न करू अशी हमी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

यावेळी आझाद मैदान येथून मोर्चास सुरवात झाल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने शासनाकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळास विधानभवनामध्ये चर्चेसाठी निमंत्रीत केले. त्यांनी राज्यातील अतिक्रमण धारकांचे सर्व म्हणने व मुद्दे ऐकून घेवून अतिक्रमण न काढणेबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.

यावेळी या शिष्टमंडळामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी , ॲड.सुरेश माने , प्रताप होगाडे , अमरसिंह पाटील , मच्छिंद्र गवाले,सुभाष मुढे,नानाभाऊ शेवाळे,नामदेव चव्हाण यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com