Agrowon Exhibition : शेतकरी वाचकांना भेटीसाठी गवसला हक्काचा कट्टा

औरंगाबादमध्ये गेल्या काही वर्षांपासून ॲग्रोवनकडून होत असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने असे शेकडो शेतकरी एकमेकांना भेटत आहेत. यंदा १३ ते १६ जानेवारी दरम्यान असंख्य शेतकरी अशा प्रकारे एकमेकांना भेटले. त्यांनी एकत्र प्रदर्शन पाहिले.
Agrowon Agricultural Exhibition 2023
Agrowon Agricultural Exhibition 2023Agrowon

ॲग्रोवनच्या माध्यमातून गेल्या सतरा वर्षांपासून कृषी तंत्रज्ञान, शेतीविषयक संशोधन, (Agricultural Research) नव्या पद्धती आणि यशोगाथांची भरभरून माहिती घेणारे वाचक शेतकरी भ्रमणध्वनीवर एकमेकांचे मित्र बनले. (Agrowon Agricultural Exhibition 2023)

परंतु, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळत नव्हती. त्यावर उपाय शोधत या वाचकांनी आता ॲग्रोवनच्या राज्यव्यापी कृषी प्रदर्शनालाच मैत्रीकट्टा बनवले आहे.

राज्यातील प्रयोगशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, अभ्यासक, विविध कृषी संस्थां व त्यांचे पदाधिकारी तसेच शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची ताजी माहिती वर्षानुवर्षे ॲग्रोवन दैनिकातून दररोज पुरवली जात आहे.

कृषी खाते, पणन, पशुसंवर्धन, दुग्धविकास या क्षेत्रातील शेकडो सरकारी व निमसरकारी संस्थांचे उपक्रम, योजना वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जात आहेत.

गेल्या १७ वर्षांपासून ॲग्रोवनकडून ही माहिती, उपक्रम, यशोगाथा प्रसिद्ध करताना संबंधितांचे संपर्क क्रमांकही आवर्जून दिले जातात.

त्यामुळे ॲग्रोवनचे वाचक शेतकरी या संपर्क क्रमांकाचा वापर करतात आणि अधिक माहिती मिळवतात. त्यातून मग एकमेकांशी कायमची मैत्रीदेखील तयार करतात.

एरवी सतत भ्रमणध्वनींवर एकमेकांशी असलेला हा संवाद प्रत्यक्ष भेटीच्या स्वरूपात उतरतो तो ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात. शेतकरी, त्यांचे गट एकमेकांना थेट या प्रदर्शनात भेटण्याचा संकल्प करतात.

औरंगाबादमध्ये गेल्या काही वर्षांपासून ॲग्रोवनकडून होत असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने असे शेकडो शेतकरी एकमेकांना भेटत आहेत. यंदा १३ ते १६ जानेवारी दरम्यान असंख्य शेतकरी अशा प्रकारे एकमेकांना भेटले. त्यांनी एकत्र प्रदर्शन पाहिले. एकमेकांच्या गावाला, शेतशिवाराला भेटीसाठी निमंत्रितदेखील केले.

Agrowon Agricultural Exhibition 2023
Agrowon Exhibition : ‘महाऊर्जे’च्या दालनावर वीज बचतीचा संदेश

ह्रदयानेही जोडले गेलो

ॲग्रोवनमध्ये मधमाशीपालनाची माहिती सतत प्रसिद्ध केली जाते. मधमाशीपालनाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नाशिक येथील बसवंत गार्डनचे प्रतिनिधी विक्रांत पाटील म्हणाले की या प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचक शेतकरी केवळ एकमेकांना भेटत नसून ते ह्रदयानेही जोडले जात आहेत. काही वाचक शास्त्रज्ञ, अभ्यासक किंवा आमच्यासारख्या कंपनी प्रतिनिधींच्या संपर्कात असतात. तेदेखील या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकमेकांना भेटतात.

४० वर्षानंतर भेटला शेतकरी मित्र

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी व ॲग्रोवनचे जाणकार वाचक दीपक जोशी यांनी सांगितले की मी शेतीची कामे बंद ठेवून तीन दिवस प्रदर्शनाला हजेरी लावली.

तेथे मला ॲग्रोवनचे वाचक व माझे ज्येष्ठ मित्र असलेले नांदेडचे शेतकरी श्री. राजूरकर तब्बल ४० वर्षानंतर भेटले. ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन हे आता आम्हा शेतकऱ्यांना एकमेकांना मनमोकळे भेटण्याचे आणि ज्ञानाची शिदोरी घेऊन जाण्याचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com