Electricity News : ट्रान्स्फॉर्मरमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील भोर व पुरंदर तालुक्यांत रोहित्र फोडून त्यामधील तेल बाहेर फेकून तांब्याच्या तारा बाहेर काढून चोरून नेले जात होते.
Electricity Transformer
Electricity TransformerAgrowon

Electricity News सासवड : पुणे जिल्ह्यातील पुरंदर व भोर तालुक्यांतील, तसेच सातारा जिल्ह्यातील ट्रान्स्फॉर्मर (Transformer) (रोहित्र)मधील तांब्याच्या तारा चोरी (Copper Wire Theft) करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला (Crime Branch) यश मिळाले.

अब्दुल रेहमान खान, इमामउद्दीन शाहाबउद्दीन खान (वय २४), जावेद हदीस खान (वय ३१), सतराम रामदुलारे चौहाण (वय २४), शफीक अहमद अब्दुलरहीम खान (वय ३३, सर्व रा. तुलसीपूर जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश, सध्या सर्व रा. नन्हे-आंबेगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Electricity Transformer
Electricity Bill : सिंधुदुर्ग-रत्नागिरीत ५३ कोटींची वीजबिल थकित

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील भोर व पुरंदर तालुक्यांत रोहित्र फोडून त्यामधील तेल बाहेर फेकून तांब्याच्या तारा बाहेर काढून चोरून नेले जात होते. त्यामुळे त्या ठिकाणाच्या परिसरात विजेचा पुरवठा खंडित होऊन त्याचा त्रास नागरिक, विशेषतः तेथील शेतकरी वर्गास होत होता.

त्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अपर अधीक्षक आनंद भोईटे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण सहायक निरीक्षक राहुल गावडे, हवालदार सचिन घाडगे, दत्तात्रेय तांबे, विजय कांचन, मुकुंद कदम, अजित भुजबळ, पो. कॉ. धीरज जाधव, समाधान नाईकनवरे, अमोल शेडगे यांचे पथक तयार केले होते.

Electricity Transformer
Agriculture Electricity : मोहोळला मिळाले सहा ट्रान्स्फॉर्मर, शेतकऱ्यांची झाली सोय

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करीत असताना या पथकास तांत्रिक विश्‍लेषण व खबऱ्यामार्फत मिळालेल्या बातमीनुसार अब्दुल हा भंगारवाला त्याच्या साथीदाराच्या मदतीने विद्युत रोहित्र फोडून त्यामधील ताब्यांच्या तारा चोरी करीत असल्याचे समजले.

या माहितीनुसार या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता इतर आरोपींच्या मदतीने विद्युत रोहित्रांमधील ताब्यांच्या तारा चोरी करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले.

आतापर्यंत ४१ रोहित्रे फोडली :

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १४ ठिकाणी व सातारा जिल्ह्यामधील २२ ठिकाणी अशा एकूण ३६ ठिकाणी ४१ विद्युत रोहित्र फोडून त्यामधील तांब्याच्या तारांची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com