Health : पित्ताशयातील खडे

जीवनशैलीमध्ये बदल होत गेला, त्यानुसार माणसाला होणारे आजार आणि त्याचे प्रमाण यामध्ये देखील बदल होत असलेला दिसून येत आहे.
Health
Health Agrowon

श्रीधर पवार

जीवनशैलीमध्ये (Lifestyle) बदल होत गेला, त्यानुसार माणसाला होणारे आजार (Illness) आणि त्याचे प्रमाण यामध्ये देखील बदल होत असलेला दिसून येत आहे. यातील एक महत्त्वाचा आजार म्हणजे पित्ताशयातील (Gall bladder) खडे. आयुर्वेदामध्ये याचे वर्णन पित्ताश्मरी म्हणून करण्यात आलेले आहे. पित्ताशयातील खडे हे बऱ्याचदा दुसऱ्या आजारासाठी पोटाची सोनोग्राफी करताना अचानकच आढळून येतात.

Health
Health : आरोग्यावर बोलू काही...

मग या वेळी एक प्रश्‍न निर्माण होतो तो म्हणजे पित्ताशयात खडे आहेत तर त्रास का नाही? यासोबतच पित्ताशयाचे खडे झाल्यानंतर दिसणारी लक्षणे, करावयाच्या तपासण्या, उपचार, उपचार न केल्यास होणारी गुंतागुंत, घ्यावयाची काळजी आणि आहार याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

पित्ताशयामध्ये खडे होण्याची कारणे?


बदललेल्या जीवनशैलीमध्ये अतिरिक्त चरबीचे अधिक प्रमाण असलेला आहार घेतला जात आहे. त्यामुळे शरीरात तयार होणाऱ्या पदार्थांचा असमतोल निर्माण होतो. शरीरात यकृतामध्ये तयार होणाऱ्या पित्तामध्ये कोलेस्टेरॉल, बिलीरुबीन, तसेच इतर अनेक रासायनिक द्रव्ये असतात. या सर्वांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास पित्ताशयात खडे तयार होतात.

बहुतेक वेळा पित्तामधील कोलेस्टेरॉल आणि बिलीरुबीनची पातळी खूप वाढते. या अतिरिक्त कोलेस्टेरॉल व बिलीरुबीनचे खडे तयार होतात. यातील कोलेस्टेरॉलपासून तयार होणाऱ्या पित्ताशयातील खड्यांचे प्रमाण जास्त असलेले आढळून येते. यासोबतच लठ्ठपणा, अवेळी जेवण, रात्रीचे जागरण यामुळे शरीरामध्ये पित्त वाढून शरीरामधील संप्रेरकांमध्ये असमतोल निर्माण होण्याचा धोका असतो.

पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढवणारे घटक


प्रमाणापेक्षा जास्त वजन, मधुमेह, असंतुलित हार्मोन, गर्भनिरोधक गोळ्या यांसह स्त्रियांमध्ये पित्ताशयात खडे होण्याचा त्रास पुरुषांपेक्षा २- ३ पटींनी जास्त आढळतो. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये मुले झाल्यानंतर गर्भावस्थेमध्ये संप्रेरकांमध्ये अनेक बदल घडून येतात. या बदलांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. म्हणूनच पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढलेला दिसून येतो.

Health
Health : देशात पाच जीवाणू ठरत आहेेत प्राणघातक

पित्ताशयात खड्यांची लक्षणे


काही ठरावीक लक्षणे पित्ताशयाच्या सर्व त्रासामध्ये आढळतात. या त्रासाची सुरुवात होताना पोटाच्या वरील भागात मध्यभागी किंवा उजवीकडे दुखण्याने होते.

सुरुवातीला आणि सर्वसाधारण दिसणारी लक्षणे ः

पोटात अचानक तीव्र वेदना होतात. या वेदना पोटातून उजव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे जातात. बहुतांश वेळा जेवल्यानंतर / काही खाल्ल्यानंतर या वेदना वाढलेल्या दिसतात. पोटात सतत टोचल्यासारखे / कळ येऊन दुखते, मोठा श्‍वास घेतल्यावर वेदना वाढतात, छातीत वारंवार दुखते, छातीत जळजळ, अपचन होणे, पोट सतत फुगल्यासारखे वाटणे, मळमळ, उलट्या, ताप येणे, थंडीने हुडहुडी भरणे, पोटात विशेषतः वरच्या भागात उजव्या बाजूला हात लावल्यावर दुखते. काही वेळा विशेषतः जर खडे पित्ताच्या प्रवाहाला अडथळा करत नसतील किंवा अडकलेले नसतील तर त्या व्यक्तीला कुठलेही लक्षण दिसत नाही, जाणवत नाहीत.

Health
Health : स्वादुपिंडाचा कर्करोग

पित्ताशयातील खड्यांचे निदान कसे करायचे?
पोटाची सोनोग्राफी ः सुरुवातीला आवश्यक असणारी तपासणी, यामध्ये पित्तनलिकेमध्ये असलेले खडे कधी कधी या तंत्राद्वारे दिसू शकत नाहीत.
एमआरआय स्कॅन ः पित्त नलिकेमधील खडे पाहण्यासाठी एमआरआय स्कॅन केले जाते.

कोलँजिओग्राफी ः ही तपासणी पित्ताशय काढण्याच्या शस्त्रक्रियेच्यावेळी पित्तनलिका बघण्यासाठी केली जाते.
सीटी स्कॅन ः पित्ताशयात खड्यांमुळे झालेल्या गुंतागुंतीचे निदान करण्यासाठी सहसा सीटी स्कॅन ही तपासणी केली जाते.

उपचार
खडे फोडणे आणि शरीरातून बाहेर पाडण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक औषधींचा उल्लेख केलेला आहे. मृदुविरेचन, भेदन करणारी औषधे आणि पंचकर्ममध्ये वर्णन केलेली विरेचन चिकित्सा पित्ताश्मरीमध्ये खूप फायदेशीर आहे. तसेच वारंवार जंतुसंसर्ग आणि नवीन खडे तयार होण्याचे प्रमाण कमी झाले नसल्यास शस्त्रक्रिया करणे हा उपचार योग्य ठरतो.

शस्त्रक्रियेमध्ये पित्ताशय काढणे ः (cholecystectomy) ही पित्ताशयातील खड्यांच्या उपचारांची मुख्य पद्धत आहे. दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे आणि पोटावर छेद घेऊन केलेली शस्त्रक्रिया ः काही तांत्रिक कारणांमुळे किंवा रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे योग्य ठरत नाही. अशावेळी पोटावर छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते.

उपचार न केल्यास होणारी गुंतागुंत
पित्ताशयाला सूज येते. यामुळे अतिशय तीव्र वेदना होतात व ताप येतो. पित्ताशयात पू होतो. यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते. पित्ताशय फुटणे एक गंभीर अवस्था आहे. पित्तनलिकेला अडथळा निर्माण होऊन कावीळ किंवा पित्तनलिकेला सूज येऊ शकते. स्वादुपिंडाच्या नलिकेला अडथळा येऊन स्वादुपिंडाला देखील सूज येऊ शकते. स्वादुपिंडाची सूज ही गंभीर स्थिती आहे. पित्ताशयाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.

Health
Crop Insurance : तुरीची २५ टक्के विमा भरपाई देण्यासाठी अधिसूचना जारी

आहार ः हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे यांचा आहारात समावेश करावा.
टाळावयाचा आहार ः तेलकट, चरबीयुक्त पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्टफूड, मांसाहार टाळावा. रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com