Health : आरोग्यावर बोलू काही...

दरवर्षी १८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण जगभरात जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह साजरा केला जातो.
Health
Health Agrowon

वैद्य श्रीधर पवार

दरवर्षी १८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण जगभरात जागतिक प्रतिजैविक (Antibiotics) जागरूकता सप्ताह साजरा केला जातो. दरवर्षी जगभरात १३ लाखांपेक्षा जास्त लोक प्रतिजैविकांचा प्रतिरोध आल्यामुळे मरण पावतात. औषध प्रतिरोध म्हणून देखील प्रतिजैविक प्रतिकार यास ओळखले जाते.

यास जागतिक आरोग्य संघटनेने जगाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी धोका असलेल्या पहिल्या १० धोक्यांच्या यादीत प्रतिजैविक औषध प्रतिरोधचा समावेश केला आहे. २०२० पूर्वी हा आठवडा ‘जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह’ म्हणून ओळखला जात होता. तेव्हा यामध्ये फक्त प्रतिजैविकांचा समावेश केला होता. २०२० पासून, त्यात प्रतिजैविक, अँटिफंगल्स, अँटिपॅरासाइटिक औषधे आणि विषाणूविरोधी औषधे यांसारख्या सर्व प्रकारच्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे.

जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह २०२२ ची थीम ‘प्रिव्हेंटिंग अँटिमाइक्रोबियल रेझिस्टन्स टुगेदर’ ही प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता नष्ट करण्यासाठी एकत्र काम करण्याबद्दल जागरूकता वाढवण्याच्या गरजेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अँटिमाइक्रोबियल औषधांचा वापर करण्याच्या चांगल्या पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना कार्य करत आहे.

औषध प्रतिरोध म्हणजे काय?

जेव्हा जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी यांसारखे सूक्ष्मजीव अशाप्रकारे बदलतात जे त्यांच्यामुळे होणारे संक्रमण बरे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या औषधांना दाद देत नाहीत आणि त्यांना कुचकामी बनवतात. सूक्ष्मजीव बहुतेक प्रतिजैविक औषधांना प्रतिरोधक बनतात तेव्हा त्यांना सुपरबग्स म्हटले जाते.

Health
Poultry Farming : कुक्कुट पालनातील अडचणी सोडविण्यासाठी समन्वय समिती

ही अवस्था संपूर्ण मानवजातीला चिंता करायला लावणारी आहे. साध्या सोप्या भाषेत बोलायचे झाले, तर ताप येण्यास कारणीभूत असणारा विषाणू सुरुवातीला अगदी थोड्या औषधाने नष्ट होत असे. परंतु औषधांचा वापर जसा वाढत गेला, त्यानुसार त्या विषाणूमध्ये बदल होऊन आता तो विषाणू नष्ट होण्यासाठी अधिक प्रभावी औषधांचा वापर करायला लागत आहे.

प्रतिजैविक औषध प्रतिरोध होण्याची कारणे

अनेकदा आजार झाल्यानंतर ते बरे करण्यासाठी औषधे वापरली जातात. यामध्ये ती औषधे रुग्णाने घेतल्यावर बहुतांश वेळा लक्षणे कमी झाल्यानंतर १ ते २ दिवसांत औषधे घेणे बंद केले जाते. अशावेळी आवश्यक तेवढा काळ प्रतिजैविक औषधे घेतली न गेल्याने काही प्रमाणात त्यास प्रतिरोध करणे विषाणू तयार होण्यास सुरुवात होते.

उपचार करताना आवश्यक नसताना उच्च श्रेणीमधील प्रतिजैविक औषधांचा वापर केल्याने त्यापेक्षा कमी श्रेणीमधील प्रतिजैविक औषधांचा प्रतिरोध निर्माण होऊ शकतो. अधिक काळ एकाच श्रेणीमधील प्रतिजैविक वारंवार वापरले गेल्याने त्या प्रतिजैविकाचा प्रतिरोध निर्माण होऊ शकतो किंवा शरीराला त्याची सवय होते. त्यामुळे शरीरावर होणारे कार्य होऊ शकत नाही. वैद्यकीय सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषधे घेणे आणि त्याचा वापर करणे आदी कारणांमुळे औषध प्रतिरोध होतो.

यासोबत प्रतिजैविकांचा अयोग्य पद्धतीने वापर, मानव आणि प्राणी दोघांसाठी घातक आहे. स्वच्छ पाणी, स्वच्छता यांचा अभाव, वारंवार संसर्ग, रोगप्रतिबंधक, आरोग्य सेवासुविधा, दर्जेदार, परवडणारी औषधे, जागरूकता आणि ज्ञानाचा अभाव कायद्याच्या अंमलबजावणीचा अभाव या सर्व कारणांमुळे संपूर्ण जगभरात प्रतिजैविक औषध प्रतिरोध वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Health
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

यामुळे शरीर किंवा उपचारांवर होणारे तोटे - अनेक लोकांच्या शरीरात पूर्वीपासून प्रतिरोधक असल्याचे आढळून आल्याने, त्यांच्यावर उपचार निवडीमध्ये मर्यादा निर्माण होतात. उपचारांचा खर्च वाढत जातो. यामुळे आपोआपच होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत असताना दिसून येते.

प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण होतो तेव्हा रोगास कारणीभूत असणारे (जसे की जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी) प्रतिजैविकांच्या उपचारांसाठी रोगप्रतिकारक बनतात. ज्यामुळे औषधांचा प्रतिकार होतो. सध्या उपलब्ध अँटिबायोटिक्स कुचकामी ठरतात. प्रतिजैविक औषधे त्यांची परिणामकारकता गमावतात, ज्यामुळे उपचार अधिक आव्हानात्मक किंवा काही प्रकरणांमध्ये अशक्य होते.

मोठ्या शस्त्रक्रिया आणि कॅन्सर केमोथेरपी दरम्यान होणाऱ्या संसर्गांवर उपचार करण्यासाठी आधुनिक प्रतिजैविकांच्या वापराशिवाय उपचार होऊ शकत नाहीत. म्हणून याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.

Health
Crop Insurance : रब्बी हंगामासाठी कोणत्या पिकांचा विमा काढू शकता ? | ॲग्रोवन

प्रतिजैविक प्रतिरोध टाळण्यासाठी...

प्रतिजैविक प्रतिरोध टाळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये रुग्ण हा प्रथम क्रमांकावर येतो, वैद्य, फार्माशिष्ट या सर्वांनी आपापल्या स्तरावर वेळीच काळजी घेतली, तर आपण प्रतिजैविक प्रतिरोध टाळू शकतो.

प्रतिजैविक औषधांच्या वापराबाबत सविस्तर माहिती प्रकाशित करणे, प्रतिजैविक औषधांच्या वापराचे नियम अधिक काटेकोर करणे, प्रतिजैविक औषधांच्या वापराबाबत जनजागृतीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना वेळोवेळी प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, अचूक प्रतिजैविकांचा वापर करण्यास प्राधान्य देणे, हॉस्पिटलमध्ये होणारे संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेवर भर देणे, प्राथमिक संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये भरती असणाऱ्या रुग्णांचा दुसऱ्या जंतुसंसर्ग होण्यापासून बचाव करणे, वैद्यांनी दिलेली औषधे योग्य मात्रेमध्ये घेतली जावीत यासाठी रुग्णांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com