Udhhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करा

शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे.
Udhhav Thackeray on election commission
Udhhav Thackeray on election commissionAgrowon

Udhhav Thackeray News: शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत (Shivsena Party Symbol) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेला निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ज्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले होते, असा आयोगच बरखास्त करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी सोमवारी (ता. २०) केली.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे दोन गट मान्य केले असतील तर आमचे आमदार आणि खासदार शिंदे गटाचा व्हीप पाळणार नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेना भवनात जिल्हाध्यक्षांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध ठाकरे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून दाखल याचिकेवर मंगळवारी (ता. २१) सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली आहे.

मंगळवारी (ता. २१) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुरू होणार आहे. या दरम्यान या याचिकेवर सुनावणी होते का याकडे लक्ष लागले आहे.

पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, की शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह चोरणे हा पूर्वनियोजित कट आहे.

माझा पक्ष आणि चिन्ह चोरता येऊ शकते, पण मी बाळासाहेब आणि माँसाहेबाच्या पोटी जन्मलो हे भाग्य त्यांना चोरता येणार नाही आणि दिल्लीला देताही येणार नाही.

आता जर आपण या षडयंत्राविरोधात लढलो नाही तर २०२४ ची निवडणूक शेवटची असेल, कारण यानंतर देशात नंगानाच सुरू असेल. आता जर जागे झालो नाही तर उशीर होईल, आता सगळ्यांनीच उभे राहिले पाहिजे.

Udhhav Thackeray on election commission
Shivsena : धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदे गटाला

गुंता वाढविण्यासाठी आयोगाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच आमचा विजय होईल, हे अनेक घटनातज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे अंदाज आल्याने घडामोडी घडल्या आहेत. आयोगातील चाकरांनी हा निर्णय दिला आहे.

मूळात अपात्रतेची टांगती तलवार असल्याने गुंता तयार करण्यासाठी ही कार्यवाही झाली आहे. पक्ष एकदम फुटला नाही. आधी १६ जण गेले, त्यानंतर २३ जणांच्या अपात्रतेची नोटीस दिली आहे. दोन तृतीयांश आमदार एका पक्षात विलिन व्हावेत, असे असताना तसे झालेले नाही.

हे सगळे समोर असूनही घाईघाईत नेमलेले आयुक्त निर्णय देतातच कसे? निवडणूक आयोगात सध्या चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. न्यायालयात यांची मनमानी चालणार नाही. बेबंदशाही करणारा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे.

Udhhav Thackeray on election commission
Udhhav Thackeray : ठाकरे-आंबेडकर यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा

शपथपत्रांची आमची मेहनत वाया का घालवली?

फुटीर आमदार आणि खासदारांच्या मतदानाची गोळाबेरीज करायची होती तर मग शपथपत्रे गोळा करायला का लावली, असा सवाल ठाकरे यांनी आयोगाला केला.

आम्ही खोटी शपथपत्रे दिल्याचे सांगत पोलिसांत तक्रारी केल्या. मात्र, तपासात ती शपथपत्रे खरी असल्याचे समोर आले. शिवसैनिकांनी पदरमोड करून शपथपत्रे केली. ती सगळी रद्दीत टाकून निर्णय कसा घेतला, असा सवाल त्यांनी केला.

व्हीप लागू करू शकणार नाहीत

शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आाणि चिन्ह दिल्याने आगामी अधिवेशनात पक्षाचा व्हीप लागू झाल्यास ठाकरे गटातील आमदारांना तो पाळतील का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे दोन गट मान्य केले असतील तर आमचे आमदार व्हीप पाळणार नाहीत. आम्ही त्याला जुमानणारही नाही, असे ठाकरे म्हणाले.

देशभरातून फोन

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आपल्याला देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांचे फोन आल्याचे ठाकरे म्हणाले, मला शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांचा फोन आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानभवनातील कार्यालयाचा ताबा

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेना पक्ष कार्यालयावर ताबा मिळविला. या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटविले. या कार्यालयात आता बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शिंदे गटाचे १६ ते १८ आमदार विधानभवनात दाखल झाले. त्यांनी कार्यालयाचा ताबा घेत फोटो हटविले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com