Chana Disease : बुरशीजन्य रोगाचा हरभरा पिकावर प्रादुर्भाव

खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही संकटात सापडला असून, बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे हरभरा पीक उन्मळून जात आहे. यामुळे यंदाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून उत्पन्नात घट होणार आहे.
Chana Disease
Chana DiseaseAgrowon
Published on
Updated on

Chana Disease Outbreak जि, लातूर निलंगा ः कधी अतिवृष्टी (Heavy Rain) तर कधी रोगराई (Chana Disease) अशा कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून शेतकरी अडचणीत सापडत आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही संकटात सापडला असून, बुरशीजन्य रोगाच्या (Chana Fungal Disease) प्रादुर्भावामुळे हरभरा पीक (Chana Crop) उन्मळून जात आहे. यामुळे यंदाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून उत्पन्नात घट होणार आहे.

यंदाचे खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरले आहेत. खरीप हंगामातील सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीन पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला कधी गोगलगाय तर कधी मोझॕक तर कधी अतिवृष्टी यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे.

Chana Disease
Chana Disease : हरभरा पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव

अशाच प्रकारे रब्बी हंगामातील अधिक पेरा असलेल्या हरभरा पिकावरही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून अचानकपणे पिके पिवळे पडून उन्मळून जात आहेत. घाट्यामध्ये असलेले पीक पूर्ण फळधारणा होण्याअगोदरच वाळून जात आहे. यामुळे या पिकाचेही उत्पन्न घटणार आहे.

Chana Disease
Chana Sowing : सोलापूरमध्ये हरभरा क्षेत्रात मोठी वाढ

तालुक्यात जवळपास ४७ हजार हेक्टर वरती हरभरा पिकाचा पेरा झाला असून शेतकऱ्यांनी फवारणी, पाणी देऊनही हे पीक अचानकपणे रोगाच्या विळख्यात सापडले आहे.

पेरणी वेळेवर झाल्याने चांगले उत्पन्न हाती लागेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी निराश झाला आहे.

आता अंतिम टप्प्यात हरभरा असल्याने कोणताही उपयोग होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही गावात हलक्या रानावरील पिकाची सध्या काढणीही सुरू आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com