जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी इमारतीसाठी निधी मंजूर

जुन्नर तालुक्यातील १५ ग्रामपंचायत कार्यालये व १० अंगणवाडी इमारती बांधकाम करण्यासाठी एकूण ३ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याचे माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
Government Fund
Government FundAgrowon

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील १५ ग्रामपंचायत कार्यालये व १० अंगणवाडी इमारती बांधकाम करण्यासाठी एकूण ३ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये निधी (Government Fund) मंजूर झाला असल्याचे माहिती आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी दिली.

आमदार बेनके म्हणाले, की उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील १५ गावांत ग्रामपंचायत कार्यालये बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपये जिल्हा परिषद स्वःनिधीतून स्व. आर. आर. पाटील ग्रामसचिवालय बांधणे या योजनेअंतर्गत एकूण २ कोटी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये भिवाडे खुर्द, जळवंडी, तेजूर, धालेवाडी तर्फे मिन्हेर, तांबे, बोरी खुर्द, सुकाळवेढे, कुसुर, उंब्रज नं २, डुंबरवाडी, येणेरे, शिरोली बुद्रुक, सोमतवाडी, वाणेवाडी, हिवरे तर्फे मिण्हेर आदी गावात ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्यात येणार आहेत.

जुन्नर तालुक्यातील विविध गावांत अंगणवाडी इमारती मोडकळीस आलेल्या आहेत या इमारतींना निधी उपलब्ध करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली होती. यामध्ये २०२२-२३ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून जुन्नर तालुक्यातील १० नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यासाठी एकूण १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाले असून, यामध्ये वास्ळवाडी - २ (वारुळवाडी), चिमणवाडी (वारूळवाडी) जाधवमळा सोमोशीवस्ती (शिरोली खुर्द), गावठाण (निमगिरी), जांभूळपट (पिंपरी पेंढार) नारायणगाव ४ (नारायणगाव), गावठाण (रोहकडी), गावठाण ( काले), ठाकरवाडी दत्तनगर (कुसुर), काळवाडी (काळवाडी) या नवीन १० अंगणवाडी इमारती बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी ११ लाख २५ हजार रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामे सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com