Free Sand Distribution : जप्त केलेली वाळू घराकुलासाठी मोफत वाटप

Sand Policy : महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
Sand
SandAgrowon

Solapur News : महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘एक हात मदतीसाठी’ या उपक्रमांतर्गत आंबे येथे मागील काही महिन्यांमध्ये २३०० ब्रास जप्त करण्यात आलेली वाळू आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी मोफत वाटप करण्यास आंबे येथे शनिवारी (ता. ५) सुरवात झाली.

मागील काही महिन्यांमध्ये आंबे येथे महसूल विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये महसूल विभागाच्या वतीने तब्बल २३०० ब्रास वाळूही जप्त करून ३१ जणांवर गुन्हे दाखल केले होते. तालुक्यातील अनेक गोरगरीब घटकातील लोकांना शासनाची घरकुले मंजूर झाली आहेत.

Sand
Sand Mining News : जळगावात वाळूउपसा बंद

परंतु, वाळू नसल्यामुळे काही घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी प्रतिलाभार्थी पाच ब्रास याप्रमाणे तालुक्यातील नऊशे लाभार्थींना ज्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे त्याच वाहनातून वाळू घरापर्यंत पोच केली जात आहे.

Sand
Maharashtra Sand Policy : राज्यात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक वाळू विक्री

शासनाचे ‘सर्वांसाठी घरे’ हे स्वप्न आहे, ते स्वप्न या मोफत वाळूमुळे पूर्ण होणार असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी गुरव, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर जिल्हाधिकारी तुषार शिंदे, मंडलाधिकारी दीपक शिंदे, गौण खनिज विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाचे नागराज, तलाठी खंडू गायकवाड, बी. ए. गोरे, घरकुल लाभार्थी व ग्रामसेवक उपस्थित होते.

लाभार्थी ९१२ अन्‌ मागणी ४१०० ब्रास

पंढरपूर तालुक्यातील ९१२ घरकुल लाभार्थींनी ४१०० ब्रास वाळूची मागणी केली आहे. परंतु ज्या लाभार्थींचे घरकुल बांधकाम सुरू आहे, जे लाभार्थी खरंच घरकुल बांधणार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com