Vegetable Farming : भेंडी पीक खानदेशात काढण्यास सुरवात

दर्जेदार भेंडी एरंडोल, धरणगाव, जामनेर, भडगाव आदी भागात घेतली जाते.
Okra Crop
Okra CropAgrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बीत किंवा थंडीच्या काळात लागवड केलेल्या भेंडी पिकात (Bhindi Crop) हवे तसे उत्पादन आलेले नाही. काढणी व इतर खर्च यामुळे पीक परवडत नसल्याने पीक काढण्यास सुरवात झाली आहे.

परिणामी बाजारात आवक अत्यल्प आहे. धरणगाव, एरंडोलातील भेंडीची मुंबई येथील मोठे खरेदीदार युरोपात पाठवणूक करतात.

दर्जेदार भेंडी एरंडोल, धरणगाव, जामनेर, भडगाव आदी भागात घेतली जाते. यंदा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या भेंडीचे दर अल्प होते. उत्पादन चांगले आले. यामुळे आवक चांगली होती. लागवडही बऱ्यापैकी होती.

Okra Crop
Okra Crop : जळगावात भेंडी पीक क्षेत्र घटले

या काळात मुंबईतूनही खरेदीदार भेंडीची मागणी करायचे. परंतु आवक अधिक राहिल्याने स्थानिक व निर्यातीच्या भेंडीचे दरही कमी होते. त्या काळात शेतकऱ्यांना किमान १२ व कमाल १५ रुपये दर मिळाला.

यामुळे पुढे रब्बीत किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अनेकांनी लागवड टाळली. ज्यांनी लागवड केली, त्यांच्या भेंडी पिकात उत्पादन कमी आले. जानेवारी व या महिन्यात भेंडीचे दर बऱ्यापैकी आहेत.

परंतु अनेकांनी लागवड टाळली तसेच ज्यांनी लागवड केली, त्यांना उत्पादन कमी आल्याने हे दरही परवडले नाहीत किंवा सर्वाना हे दर मिळाले नाहीत. शेतकऱ्यांच्या भेंडीला मागील महिनाभरापासून ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे.

परंतु एक एकरात दोन दिवसाआड ६० ते ७० किलो एवढेच उत्पादन येत आहे. ती काढणीलाही परवडत नाही. कारण मजुरी खर्च अधिक लागतो. यामुळे भेंडी पीक मागील सात ते आठ दिवसात काढण्यात आले आहे. परिणामी बाजारात आणखी आवक कमी झाली आहे.

सध्या शेतकऱ्यांना ४० रुपये व यापेक्षा अधिकचे दर प्रतिकिलोसाठी मिळत आहेत. तर किरकोळ बाजारात विक्रेते ५५ ते ६०, ७० रुपये प्रतिकिलो या दरात भेंडीची विक्री करीत आहेत. सध्या जळगाव बाजार समिती वगळता इतर बाजारांत भेंडीची आवक होत नसल्याची स्थिती आहे.

Okra Crop
Okra Pest Management : भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

या बाजारातही रोज सात ते आठ क्विंटल एवढीच आवक होत आहे. ही आवक जामनेर, यावल, चोपडा यासह औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड या भागातून होत आहे. काही शेतकरी आपापल्या भागातील आठवडी बाजारात भेंडीची विक्री करतात.

यामुळे बाजार समितीत आवक होत नाही, अशीही माहिती मिळाली. परंतु सध्या उन्हाळ भेंडीची लागवड वेगात सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी मागील महिन्यातच लागवड केली आहे. यामुळे मार्चच्या मध्यात आवक बऱ्यापैकी राहू शकते, असाही अंदाज आहे.

या भागात लागवड...

जळगाव जिल्ह्यात धरणगाव, एरंडोल, जामनेर, यावल, चोपडा भागात भेंडी पिकाची दर दोन महिन्याआड लागवड केली जाते. अनेक भाजीपाला उत्पादक एक एकर, पाऊण एकरात सातत्याने लागवड करतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com