
पुणे : राज्याच्या अनेक भागांत परतीच्या पावसाने जोर (Return Monsoon Heavy Rain) धरला आहे. मध्य भारतातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान (Favorable Weather For Return Journey Of Monsoon) होत आहे. आज (ता. १२) उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज (Rain Forecast With Lightning) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.
दक्षिण भारतात केरळ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून कर्नाटक, मराठवाडा, विदर्भ, नैर्ऋत्य मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
पोषक हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे मंगळवारी उन्हाचा चटका काहीसा कमी झाला होता. आज (ता. १२) उत्तर महाराष्ट्र पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी परतले. परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा तब्बल आठवड्यानंतरही मंगळवारी (ता. ११) कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून काढता पाय घेण्याचे संकेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.