Farmer Loan Recovery : तीन महिने थांबविली सक्तीची कर्ज वसुली

Buldana DCC Bank : या बैठकीत बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने तीन महिने वसुली थांबवून सात बारावर नाव लावणार नसल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी दिली.
Buldana DCC Bank
Buldana DCC Bank Agrowon

Buldana News : शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांना अनुसरून बैठक घेतली. या बैठकीत बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने तीन महिने वसुली थांबवून सात बारावर नाव लावणार नसल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी दिली.

शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २५) शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत तातडीची बैठक घेऊन आंदोलनात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चा केली.

Buldana DCC Bank
Crop Loan : खानदेशातील पीककर्जाचे शेकडो प्रस्ताव रखडले

कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने लावलेले ४० टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावे, बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करुन हर्राशी करणे व सातबारावर बँकेचे नाव लावण्याची कार्यवाही बंद करून सक्तीची वसुली थांबवावी, बिगरशेती कर्ज सक्तीने वसुल करावे, वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा आदी मागण्यांसाठी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

Buldana DCC Bank
Crop Loan : धुळे जिल्ह्यात २० टक्केच पीककर्ज वितरित

या आंदोलनाची दखल घेत उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात जिल्हा केंद्रीय बँकेचे मुख्य प्रशासक डॉ. अशोक खरात, सरव्यवस्थापक श्री. इथापे यांच्यासह संबंधित खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. प्रत्येक मागणीवर शेतकरी नेत्यांचे समाधान करीत निर्यात शुल्काबाबतची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोविण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच वन्यप्राणी शेतीच्या पिकाचे नुकसान करीत असल्याच्या तक्रारी आल्या तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करुन कार्यालयात द्यावे, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

या बैठकीला शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देविदास कणखर, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ थुट्टे, शेनफड घुबे, नामदेवराव जाधव, मुरली महाराज येवले, समाधान कणखर, तेजराव मुंढे, प्रकाश घुबे, निवृत्ती सावळे आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com