Summer Season : राज्यात उन्हाळ्याची चाहूल

कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. राज्यात उन्हाचा चटका सातत्याने वाढत आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 

Weather Update पुणे : कमाल तापमानात (Maximum Temperature) झालेल्या वाढीमुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल (Summer Footfall) लागली आहे. राज्यात उन्हाचा चटका (Heat) सातत्याने वाढत आहे. तर किमान तापमानातही वाढ होत आहे.

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

सूर्य तळपण्यास सुरूवात झाल्याने राज्यात उन्हाचा झळा वाढत आहेत. बुहतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या वर असून, अनेक ठिकाणी ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे.

Weather Update
Weather Update : तापमानात वेगाने वाढ शक्य

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोले सह धुळे येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणातील सांताक्रूझ, मध्य महाराष्ट्रातील धुळे, निफाड, नाशिक, सोलापूर, विदर्भात अमरावती, वाशीम, यवतमाळ, ब्रह्मपूरी आणि वर्धा येथे पारा ३६ अंशांच्या वर होता.

Weather Update
Weather Update : तापमानात चढ-उतार सुरू

राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. निफाड येथे गारठा कायम असला तरी उर्वरित राज्यात किमान तापमान १० अंशांच्या पुढे गेले आहे.

किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढीबरोबरच आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवार (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.२ (१२.२), जळगाव ३५.७ (१०.७), धुळे ३७.०(१२.०), कोल्हापूर ३३.६ (१९.५), महाबळेश्वर ३१.६ (१७.६), नाशिक ३६.३ (१३.२), निफाड ३६.४(८.६), सांगली ३५.२ (१२.२), सातारा ३४.७ (१५.०), सोलापूर ३६.४ (१८.६),

सांताक्रूझ ३६.१ (१९.४), डहाणू ३१.४ (१७.५), रत्नागिरी ३३.१ (२०.०), औरंगाबाद ३५.४ (१३.८), नांदेड - (१७.०), परभणी ३५.७(१६.०), अकोला ३८.५ (१५.६), अमरावती ३६.८(१४.९), बुलढाणा ३५.०(१८.२),

ब्रह्मपूरी ३६.३ (१६.५), चंद्रपूर ३५.२ (१७.३), गडचिरोली ३३.६(१४.६), गोंदिया ३४.२ (१४.५), नागपूर ३५.९ (१५.०), वर्धा ३६.५(१६.४), वाशीम ३६.२ (१५.०), यवतमाळ ३६.२ (१६.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com