Vidarbha Flood : पूर्व विदर्भात पूरस्थिती

Vidarbha Flood Update : पश्‍चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात पावसाचे धुमशान जोरदारपणे सुरू आहे. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : पश्‍चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात पावसाचे धुमशान जोरदारपणे सुरू आहे. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

यवतमाळ शहराच्या शास्त्री नगर परिसरात सांडपाण्याच्या नाल्यात वाहून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

तर चंद्रपूरमध्ये इरई प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजुरा तालुक्‍यात ३ हजार ३०० हेक्‍टरवरील कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत आठवडाभरापासून धो-धो पाऊस कोसळत आहे. याचा पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.

परिणामी अनेक तालुक्‍यांमध्ये पिके पाण्याखाली आली आहेत. नागपूर शहराच्या सखल भागात निचरा न झाल्याने रहिवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे धान्यासह महागड्या साहित्याचे नुकसान झाले.

Rain Update
Vidarbh Rain Update : विदर्भात पावसाची उघडीप

चंद्रपूरमध्ये शुक्रवारी (ता.२८) पहाटेपासूनच पूरस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. इरई प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना याचा फटका बसला आहे. शहरातील अनेक भागही जलमय झाले आहेत. अनेकांनी घरात न थांबता इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या मजल्याचा आधार घेतला आहे. राजुरा तालुक्‍यात ३६ हजार हेक्‍टर जमीन लागवडीखाली आहे.

Rain Update
Vidarbh Rain : पूर्व विदर्भ परिसराला पुन्हा पावसाचा तडाखा

त्यातील २६ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड आहे. परंतु यातील ३३०० हेक्‍टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भद्रावती (चंद्रपूर) तालुक्‍यातील पिंपरी गावाला बेटाचे स्वरूप आले आहे.

पिंपरीसह कोंची व घोणाड या गावातील नागरिक पुरामुळे गावातच अडकले आहेत. वर्धा नदीचे पाणी सारखे वाढतच असल्यामुळे गावकऱ्यांनी आवश्‍यक साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे.

गडचिरोलीत पूरस्थिती हाताबाहेर

गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती हाताबाहेर जात असल्याने काही मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. नागपूर शहर व परिसरातही पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. वर्धा जिल्ह्याला देखील पावसाच्या पाण्याचा फटका बसला आहे.

शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या

२४ तासांतील पाऊस (मिलिमिटर)

अकोला २.५

अमरावती १७.४

ब्रह्मपुरी ३९.४

चंद्रपूर ९८.४

गडचिरोली ९७.८

गोंदिया १३.२

नागपूर ७५.२

वर्धा ४९

वाशीम २

यवतमाळ ७५.१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com